लांजा : स्विफ्ट कारने रिक्षाला समोरासमोर धडक दिल्याने रिक्षाचालक जखमी झाला. तर रिक्षाचे देखील मोठे नुकसान झाले. हा अपघात शुक्रवारी २९ ऑगस्ट रोजी शिपोशी माळवाडी येथे घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबतची खबर शहानवाज बशीर सारंग (वय २७ वर्षे राहणार शिपोशी माळवाडी) त्याने लांजा पोलिसांना दिली. अस्लम अहमद लांजेकर हा शुक्रवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या ताब्यातील ऑटो रिक्षा क्रमांक एम एच ०८ बीसी ०३८४ घेऊन केळवली ते शिपोशी असा चालला होता. शिपोशी माळवाडी या ठिकाणी वाटुळहून आलेल्या स्विफ्ट कार (क्रमांक एम एच ०८ एम ४२५७) ने या रिक्षाला समोरासमोर धडक दिली. यामध्ये रिक्षा चालक अस्लम लांजेकर हा जखमी झाला.
त्याच्यावर लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेत रिक्षाच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल उर्मिला शेडे या करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:55 PM 30-Aug-2025














