Ratnagiri : 3 सप्टेंबर रोजी ज्युनिअर जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धा

रत्नागिरी : १९ वर्षे वयोगटातील राज्य ज्युनिअर तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धा मुले व मुली सन २०२५-२६ चे आयोजन महाराष्ट्र फेन्सींग असोसिएशनने भंडारा येथे दि.२६ ते २८ सप्टेंबर, २०२५ या काळात केले आहे. जन्मतारीख ०१/०१/२००६ नंतर जन्मलेले मुले व मुली सहभागी होण्यासाठी पात्र आहेत सदर स्पर्धा फॉइल, ईप्पी व सेबर या 3 प्रकारात घेण्यात येणार आहेत.

सदर स्पर्धेच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा फेन्सींग असोसिएशनने दि. ०३ सप्टेंबर, २०२५ रोजी रत्नागिरी जिल्हा निवड चाचणी व जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित केली आहे. सदर स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, खुलं नाट्यगृहाशेजारी, मारुतीमंदीर, रत्नागिरी जि. रत्नागिरी येथे संध्याकाळी ४ वाजता सुरू होणार आहे. हा खेळ प्रकार व ही राज्यस्तरीय स्पर्धा १० वी व १२वी साठी १० गूण मिळण्यासाठी पात्र आहे.

तरी खेळाडूंनी क्रीडा प्रकाराचे साहित्य व वयाच्या मूळ दाखल्यासह उपस्थित राहावे. सदर निवड चाचणी मधून रत्नागिरी जिल्हा संघाची निवड केली जाईल. कमीत कमी ४ खेळाडूंचा सहभाग असेल तर गटातील प्रथम ३ क्रमांकांना मेडल दिली जातील.तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा असोसिएशनच्या सचिवा श्रीम. समिधा संजय झोरे यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क मार्तंड झोरे ९३७०२१५५२२, ९८८१२२७६९९.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
5:37 PM 30-Aug-2025