Khed : ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत तळे येथे २९ सप्टेंबरला आरोग्य शिबिर

खेड : प्राथमिक आरोग्य केंद्र तळे यांच्या वतीने ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान’ अंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सोमवार, दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आले असून कार्यक्रमासाठी विविध वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या शिबिरात डॉ. अमेय हडकर, डॉ. श्रद्धा जाधव, (वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. के. तळे), डॉ. सुप्रिया देव्हारे (योगिता डेंटल कॉलेज खेड), डॉ. अल्मान, तसेच नेत्रतज्ज्ञ श्रीमती मोनिता कर्मकार (ग्रामीण रुग्णालय कळंबणी) या तज्ज्ञांचा सहभाग लाभणार आहे. या शिबिराला सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील, तसेच गावातील नागरिकांनी उपस्थित राहून आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र तळे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 27/Sep/2025

Sahyog multi.