आमदार राजन साळवी यांनी नतमस्तक होत राजापूरवासियांप्रती केली कृतज्ञता व्यक्त

राजापूर : लांजा-राजापूर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार राजन साळवी यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सभा घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी राजापूरवासियांनी आजपर्यंत त्यांच्यावर दाखविलेल्या विश्वासाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते राजापूरकरांसमोर नतमस्तक झाले. सभेला येण्यापूर्वी त्यांनी श्री धुतपापेश्वराचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. जवाहर चौक दर्गा येथे चादर पांघरली. श्री निनादेवी चे दर्शन घेतले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

सभास्थळी आल्यानंतर सर्वप्रथम आमदार राजन साळवी यांचे मोठे बंधू यांना नमस्कार केला. त्यानंतर ते सर्व जनतेसमोर नतमस्तक झाले. तत्पूर्वी कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून आणून त्यांचे जंगी स्वागत केले.

यावेळी सभेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख विलास चाळके, काँग्रेसच्या माजी विधान परिषद सदस्या ॲड. हुस्नबानू खलिफे, शिवसेना नेते अजित यशवंतराव, राजापूरचे माजी नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक सौ. नेहा माने, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. स्वरूपा साळवी, तालुकाप्रमुख कमलाकर कदम, महम्मद शेठ रखांगी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राज राजापकर, अभय मेळेकर, अभिजीत तेली, नरेश शेलार, संदीप दळवी, नुरुद्दीन सय्यद, मंदार सप्रे, प्रसाद मोहरकर, तात्या सरवणकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:32 PM 24/Oct/2024