‘गुरुवर्य एम एन जोशी स्कूल’ ठरली ‘आकारच्या डान्स चॅम्पियनशिप’ ची मानकरी

रत्नागिरी : रत्नागिरीतील प्रसिद्ध आकार डान्स अकॅडमी तर्फे यंदा रत्नागिरीतील शाळांसाठी इंटर स्कूल डान्स चॅम्पियनशिप चे आयोजन स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील तब्बल 19 शाळांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था रत्नागिरीच्या वरिष्ठ अधिव्याख्याता श्रीमती दीपा सावंत मॅडम यांच्या हस्ते व निर्माण ग्रुपचे श्री संतोष तावडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि मुख्य प्रायोजक अमेय ज्वेलर्सचे अमेय विरकर व इतर मान्यवर प्रायोजकांच्या उपस्थितीत पार पडले. अटीतटीच्या या स्पर्धेत गुरुवर्य एम एन जोशी इंग्लिश मीडियम स्कूल ने ग्रुप चॅम्पियनशिप मिळवली. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे पहिली ते तिसरी गट- उत्तेजनार्थ द्वितीय परी धांगडे (एमएन जोशी स्कूल) उत्तेजनार्थ प्रथम अवनीश होतेकर (एस व्ही एम) तृतीय क्रमांक साईश झोरे (पोदार स्कूल) द्वितीय क्रमांक रियांश साखरपेकर (परशुराम पंत विद्यालय) प्रथम क्रमांक देवश्री गायकवाड (नवनिर्माण स्कूल)

गट चौथी ते सहावी – उत्तेजनार्थ द्वितीय तीर्था वैद्य (एम एन जोशी स्कूल) उत्तेजनार्थ प्रथम सारा नायर (एस व्ही एम) तृतीय क्रमांक नायशा कांबळे (पोदार स्कूल) द्वितीय क्रमांक मैथिली भोळे (जी जी पी एस) प्रथम क्रमांक ऐश्वर्य मनोरकर (नवनिर्माण स्कूल)
गट सातवी ते दहावी – उत्तेजनार्थ द्वितीय स्मार्था पाटील (बाबासाहेब नानल गुरुकुल) उत्तेजनार्थ प्रथम प्रांजल परब (एस व्ही एम) तृतीय क्रमांक स्वरा मुसळे (पटवर्धन हायस्कूल) द्वितीय क्रमांक प्रतीक पुजारी (शिर्के प्रशाला) प्रथम क्रमांक शौर्या काजरेकर (जगद्गुरु नरेंद्र महाराज इंग्लिश मीडियम स्कूल)

ग्रुप डान्स या गटात उत्तेजनार्थ द्वितीय सौ सविता कामत विद्यामंदिर (अविष्कार) ,उत्तेजनार्थ प्रथम ॲड बाबासाहेब नानल गुरुकुल, तृतीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा पानवल होरंबेवाडी, द्वितीय क्रमांक मराठा मंदिर ग्लोबल स्कूल ,प्रथम क्रमांक गुरुवर्य एम एन जोशी इंग्लिश स्कूल यांनी बक्षीस मिळविले. स्पर्धेला परीक्षक म्हणून आसावरी आखाडे राऊत आणि हर्षल विलास म्हामुणकर यांनी काम पाहिले. कार्यक्रम बघायला येणाऱ्या मुलांमधून भव्य लकी ड्रॉ चे पहिले बक्षीस कुमारी पर्णी विलणकर या दुसरीतील मुलीला लागले. शाळेच्या मुलांसाठी एक योग्य व्यासपीठ देण्याचा आमचा प्रयत्न होता आणि तो यशस्वी झाला पुढच्या वर्षी यापेक्षा भव्य दिव्य स्पर्धा घेऊन जास्तीत जास्त शाळांना सहभागी करून घेण्याचा आमचा प्रयत्न राहील असे आकारचे संचालक श्री अमित कदम यांनी सांगितले.बक्षीस समारंभ नगरसेवक श्री निमेशजी नायर,श्री अमेय वीरकर,सौ अक्षता इंदुलकर,श्रीमती नेहा देसाई, सौ सलोनी सातवेकर, श्री वैभव सावंत, श्री संतोष तावडे ,श्री प्रदीप कट्टेपाटील, श्री पाटील, श्री शिवांग साळवी ,श्री प्रथमेश साळवी, सौ आसावरी आखाडे ,श्री हर्षल म्हामुणकर ,श्री अमित कदम यांच्या उपस्थितीत पार पडला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:29 PM 30/Dec/2025