Dalai Lama Wins First Grammy Award: दलाई लामा यांचा ग्रॅमी पुरस्काराने गौरव!

Dalai Lama Wins First Grammy Award: तिबेटचे अध्यात्मिक नेते दलाई लामा यांना त्यांचा पहिला ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. महत्त्वाचे म्हणजे, संगीत उद्योगातील सर्वोच्च पुरस्कार ग्रॅमी हा पुरस्कार एखाद्या आध्यात्मिक नेत्याला मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

विशेष म्हणजे, दलाई लामा यांना वयाच्या 90 व्या वर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ग्रॅमी पुरस्कार जाहीर होताच, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे. जगभरातून त्यांचं कौतुक करण्यात येत आहे.

68 व्या वार्षिक ग्रॅमी पुरस्कार सोहळा लॉस एंजेलिसमध्ये पार पडला. या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. 68 व्या ग्रॅमी सोहळ्यात दलाई लामा यांच्या मेडिटेशन : द रिफ्लेक्शन्स ऑफ हिज होलिनेस द दलाई लामा या अल्बमला पहिला पुरस्कार मिळाला आहे. 1 फेब्रुवारी 2026 रोजी लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या 68 व्या वार्षिक ग्रॅमी पुरस्कारांमध्ये दलाई लामा यांच्या अल्बमला सर्वोत्कृष्ट ऑडिओ बुक, नॅरेशन आणि स्टोरीटेलिंग रेकॉर्डिंग श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे.

सोमवारी दलाई लामा यांनी त्यांच्या पहिल्या ग्रॅमी पुरस्कार विजेतेपदाबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “मी हा सन्मान कृतज्ञता आणि नम्रतेने स्वीकारतो. मी ते वैयक्तिक कामगिरी म्हणून पाहत नाही, तर आपल्या जागतिक जबाबदारीची ओळख म्हणून पाहतो”, असं त्यांनी सांगितलं.

Horizon techno.

https://www.instagram.com/dalailama/?utm_source=ig_embed&ig_rid=c0c4daa7-28b6-45cc-87be-68807a5f1f3b

ग्रॅमी पुरस्कार हे जगातील सर्वात प्रतिष्ठित संगीत पुरस्कार आहे. जे संगीताच्या जगात सर्वात महत्त्वाचे मानले जाते. दलाई लामा 68 वे वार्षिक ग्रॅमी पुरस्कार मिळाले. दलाई लामा यांनी वयाच्या सहाव्या वर्षी पारंपारिक बौद्ध शिक्षण सुरू केले. वयाच्या 25 व्या वर्षी त्यांना सर्वोच्च बौद्ध पदवी गेशे ल्हारम्पा मिळाली. ग्रॅमी पुरस्कार जाहीर होताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. जगभरातील अनेक सन्मानांनी गौरवण्यात आलेल्या दलाई लामा यांच्या पुरस्कारांच्या यादीत आता ग्रॅमी अवॉर्ड्सचीही भर पडली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 03-02-2026