गुरुपौर्णिमेनिमित्त कोळंबे येथील वसतिगृहातील विद्यार्थ्यांना प्राणिक हीलिंग मार्गदर्शन, अन्नदान

Jul 26, 2024 - 17:05
 0
गुरुपौर्णिमेनिमित्त कोळंबे येथील वसतिगृहातील विद्यार्थ्यांना प्राणिक हीलिंग मार्गदर्शन, अन्नदान

त्नागिरी : कोळंबे (ता. संगमेश्वर) येथील गुरुकुल विद्यार्थी वसतिगृहात गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून प्राणिक हीलिंगसंदर्भात माहिती देण्यात आली.

यावेळी मेंदू संतुलन, अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित करणे, कार्य क्षमता वाढवणे, मनाची चंचलता कमी करणे या विषयावर तेजस महागावकर यांनी मार्गदर्शन केले.

वसतिगृहातील विद्यार्थ्यांना योगविद्या प्राणिक हीलिंग फाउंडेशनमार्फत अन्नदान करण्यात आले. यावेळी कोळंबे परिसर विद्या प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, वसतिगृहातील प्रमुख, नित्या प्राणिक हीलिंग सेंटरचे प्रमुख तेजस महागावकर, निशा महागावकर उपस्थित होते.प्राणिक हीलिंगविषयी अधिक माहितीसाठी नित्या प्राणिक हिलिंग सेंटर, वॉर्ड २, घर नं ४४५, समर्थ नगर, जोशी गोडाऊनजवळ, कुवारबाव, रत्नागिरी (9320333688, 9320550048) येते संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:25 26-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow