कासार्डे तिठा येथे १ लाख ११ हजारांची दहीहंडी

Aug 21, 2024 - 14:48
 0
कासार्डे तिठा येथे १ लाख ११ हजारांची दहीहंडी

कासार्डे : कोकणातील मानाची दहीहंडी समजल्या जाणाऱ्या कासार्डे (ता. कणकवली) येथील भाजप प्रदेश चिटणीस तथा माजी आमदार प्रमोद जठार मित्रमंडळाच्या वतीने २७ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते रात्री १० या वेळेत गोपाळकाला साजरा होणार आहे. यानिमित्त कासार्डे तिठा येथील महामार्गनजीक पटांगणामध्ये भव्य दहीहंडीचे आयोजन केले आहे. या उत्सवामध्ये सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्यातील गोविंदा पथकांना सहभागी होता येईल.

विजेत्या गोविंदा पथकाला मित्रमंडळातर्फे १ लाख ११ हजार १११ रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. आठ थरांचे मनोरे रचून दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला रोख १ लाख ११ हजार १११ रुपये आणि आकर्षक कोकण दूध चषक देण्यात येणार आहे. यावेळी चार थरांची सलामी देणाऱ्या पथकांना रोख २ हजार २२२ रुपये, पाच थरांची सलामी देणाऱ्यासाठी ३ हजार ३३३ रुपये, सहा थरांची सलामी देणाऱ्यांना ४ हजार ४४४ रुपये, सात थरांची सलामी देणाऱ्यासाठी ५ हजार ५५५ रुपये आणि प्रत्येकी आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येईल.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:14 PM 21/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow