चिपळूणमध्ये ७५ फूट ध्वजस्तंभाचे उद्घाटन

Aug 30, 2024 - 09:54
 0
चिपळूणमध्ये ७५ फूट ध्वजस्तंभाचे उद्घाटन

त्नागिरी : चिपळूणमधील बुरूमतळी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ७५ फुटी ध्वजस्तंभांचे उद्घाटन गुरुवारी झाले.

कोनशिलेचे अनावरण करून आणि कळ दाबून ध्वजस्तंभावर ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, मुख्याधिकारी विशाल भोसले, तहसीलदार प्रवीण लोकरे, माजी नगराध्यक्ष सुरेखा खेराडे आदींसह नागरिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय आणि माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री म्हणाले, रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आहे, ज्या जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ७५ फुटी ध्वजस्तंभ उभारण्यात येत आहे. राष्ट्रध्वजापासून तरुणांनी प्रेरणा घेतली पाहिजे. तरुणांमध्ये कायम देशभक्ती जागृत असली पाहिजे, या भावनेतून नियोजन मंडळाच्या निधीतून हे ध्वज उभारण्यात येत आहेत. राष्ट्रीय ध्वज कायमस्वरुपी त्यांच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये असला पाहिजे. या ध्वजाचा अवमान होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. अनेक कार्यक्रम या ध्वजासमोर झाले पाहिजेत. वर्षातून एक दिवस जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळांचा राष्ट्रभक्तिपर गीतांचा समूहगानाचा कार्यक्रम नावीन्यपूर्ण योजनेमधून करण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

आमदार श्री. जाधव आणि आमदार श्री. निकम यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद जवानांचे कुटुंबीय, स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय आणि माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

त्यानंतर खेड तहसीलदार कार्यालयाच्या आवारातही पालकमंत्र्यांच्या हस्ते ७५ फुटी ध्वजस्तंभांचे उद्घाटन  झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 30-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow