चिपळूण : कोंढे-चंदनवाडीत शेतात मगर; 'वर्ल्ड फॉर नेचर' संस्थेकडून सुटका

Jun 25, 2024 - 10:45
 0
चिपळूण : कोंढे-चंदनवाडीत शेतात मगर; 'वर्ल्ड फॉर नेचर' संस्थेकडून सुटका

चिपळूण : तालुक्यातील कोंढे-चंदनवाडी येथील एका शेतामध्ये मगर आढळल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. वर्ल्ड फॉर नेचर संस्थेच्या प्रतिनिधींनी सुमारे पाच फूट लांब असलेल्या मगरीला सुरक्षितरीत्या पकडून चिपळूण वनविभागाच्या ताब्यात दिले.

चिपळूण शहरातील तलाव, पेढे, वाशिष्ठी नदीत मगरींचा वावर वाढलेला आहे. येथील लोकांना मगरीचे वारंवार दर्शन होत आहे. तालुक्यातील कोंढे-चंदनवाडी येथे शेतात मगर असल्याची माहिती शेतकऱ्यांना मिळाली. शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीशी संपर्क साधला. ग्रामपंचायतीकडून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले. काही ग्रामस्थांनी या घटनेची माहिती वर्ल्ड फॉर नेचर संस्थेच्या रत्नागिरी जिल्हा कार्यालयाला दिली. त्यानुसार प्रथमेश पवार व प्रणित कलकुटकी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मोठा पाऊस झाल्यामुळे शेतात चिखल होता. त्यामुळे मगरी पकडण्याचे काम जिकिरीचे होते. या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या साथीने मोठ्या शिताफीने मगरीला पकडले. मगरीला वनविभागाच्या ताब्यात देऊन नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 25/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow