खेड : लोटे येथे १५ दिवसांच्या पावसात सर्व्हिस रोडवरची दुरवस्था

Jun 26, 2024 - 14:57
Jun 26, 2024 - 15:20
 0
खेड : लोटे येथे  १५ दिवसांच्या पावसात  सर्व्हिस रोडवरची दुरवस्था

लोटे : मुंबई-गोवा महामार्गावर बनवण्यात आलेला सर्व्हिस रोड केवळ पंधरा दिवसांच्या पावसानेच उखडला. लोटे येथे महामार्गाच्या पश्चिमेकडील सर्व्हिस रोडवर मोठमोठे खड्डे पडून वाहन चालकांचे अपघात होत आहेत.


मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामधील कशेडी ते परशुराम असे चौपदरीकरणाचे काम कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड या कंपनीकडे देण्यात आले आहे. मात्र, या कामांमध्ये समावेश असलेल्या महामार्गाच्या दोन्ही बाजूचे ठिकठिकाणी सर्व्हिस रोड अवघ्या पंधरा दिवसांच्या पावसाने उकरले असून, मोठे खड्डे पडले आहेत. या खड्यांमधून मार्ग काढताना दुचाकीस्वार, रिक्षा चालक अन्य वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. लोटे येथे महामार्गाच्या पश्चिमेकडील घाणेखुंट, कोतवली, सोनगाव या गावांसाठी तयार करण्यात आलेला सर्व्हिस रोड केवळ पंधरा दिवसांच्या पावसातच उखडला गेला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:25 PM 26/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow