संगमेश्वर : कडवईत रस्त्याला नदीचे स्वरूप

Jul 8, 2024 - 09:45
 0
संगमेश्वर : कडवईत रस्त्याला नदीचे स्वरूप

कडवई : संगमेश्वर तालुक्यातील कडवई बाजारपेठ ते गुरववाडी पूल येथील सुमारे २५० मीटर रस्ता व तुरळ फाटा ते कडवई येथील पूल या दरम्यान १०० मीटर रस्ता येथे डांबरीकरण झाले; परंतु गटारे काढण्यात आली नाहीत. परिणामी, पाऊस वाढताच पावसाच्या पाण्याने रस्त्याची खडी व साईड पट्टीचा भराव वाहून चालला असून, हे चिखलमिश्रित पाणी रस्त्यावरून वाहत आहे. या पाण्यामुळे रस्त्याला नदीचे रूप प्राप्त झाले आहे.

या रस्त्यावरून गाड्या चालविताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. यामध्ये काही दुचाकीस्वार घसरून पडले आहेत. खडी निघाल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देऊन भूमिगत पक्क्या गटारांची व्यवस्था करावी, अशी ग्रामस्थ व नागरिकांची मागणी आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 08/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow