दापोली विधानसभा मतदारसंघात २ लाख ८५ हजार मतदार

Sep 6, 2024 - 15:01
 0
दापोली विधानसभा मतदारसंघात २ लाख ८५ हजार मतदार

दापोली : दापोली विधानसभा क्षेत्रात १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनेरनिरक्षण कार्यक्रमानुसार अंतिम मतदार यादी ३० ऑगस्टला प्रसिद्ध झाली. त्यानुसार मतदार संघात एकूण मतदार २ लाख ८५ हजार २९३ असून, स्त्री मतदार १ लाख ४८ हजार २५२ आणि पुरुष मतदार १ लाख ३७ हजार ४१ आहेत. लोकसभेनंतर झालेल्या या मतदार नोंदणी कार्यक्रमात ३ हजार ९६५ मतदारांची भर पडली आहे.

दापोली विधानसभा मतदारसंघातील १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती. त्या वेळी दापोली विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ८१ हजार ३२८ एकूण मतदार होते. त्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यात एकूण २ लाख ८५ हजार २९३ मतदार आहेत.

त्यात ज्येष्ठ नागरिक मतदार ३ हजार ७२०, युवा मतदार ४ हजार ४०६ व दिव्यांग १ हजार ५०० मतदार आहेत. दापोली, मंडणगड, खेड या तीन तालुक्यातील काही मतदान केंद्रावर जाण्यासाठी २ ते ३ किलोमीटरपेक्षा जास्त अंतर चालावे लागते, त्या ठिकाणी २१ नवीन मतदान केंद्रे करण्यात आली आहेत. ज्या मतदान केंद्राच्या इमारती नादुरुस्त आहेत आणि ज्या इमारतींमध्ये तीनपेक्षा जास्त मतदान केंद्र आहेत अशा २३ मतदान केंद्रांची ठिकाणे बदलण्यात आली आहेत. ज्या मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी अधिक होते अशा ५ मतदार केंद्राचे समायोजन करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत ३७९ मतदान केंद्र होती. आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत ३९२ मतदान केंद्र असतील, नवीन गावात तयार झालेली मत्तदान केंद्र दापोली तालुक्यात भाटघर, दाखण, चिंचाळी, कोगळे, माटवण, कोवळकोंड, वाघये, बोरघर, पंचनदी तर मंडणगड तालुक्यात उंबरशेत, टाकवलो आणि खेड तालुक्यात वाडी जैतापूर अशी आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादीत आपले नाव तपासणी करणे आवश्यक आहे. मतदार यादीतून नाव वगळले गेले असल्यास किंवा नव्याने सामाविष्ट करावयाचे असल्यास पात्र मतदारांनी कार्यालयाकडे अर्ज करावयाचे आहेत, तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजवावा डॉ. अजित थोरबोले, प्रांताधिकारी, दापोली

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:29 PM 06/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow