खेड : रघुवीर घाटात हुल्लडबाज तरुणांवर कारवाई
खेड : पावसाळा सुरू असल्याने तालुक्यातील रघुवीर घाटाचे निसर्गसौंदर्य खुलले आहे. धबधबे ओसंडून वाहत आहेत. अशातच पावसाळी पिकनिकच्ची मजा घेण्यासाठी रघुवीर घाटात गेलेल्या हुल्लडबाज तरुणांवर खेड पोलिसांनी कारवाई केली आहे.
रघुवीर घाटातील धबधबे प्रवाहित झाल्यामुळे रघुवीर घाटात मजामस्ती करणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी रघुवीर घाटात पर्यटनाला येऊन रस्त्यामध्ये मद्यपान करणाऱ्या हुल्लडबाज पर्यटकांवर खेड पोलिसांनी कारवाई करत दारू जप्त केली. पावसाळी पर्यटन करताना किंवा पिकनिकला जाताना घाटात गाडी उभी करून मजामस्ती करणे किंवा दारू पार्टी करणे कायद्यान्वये गुन्हा आहे. त्यामुळे पर्यटकांनी असे कृत्य करू नये, असे आवाहन खेड पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 09/Jul/2024
What's Your Reaction?