लांजातील कुवे-इंदवटी-वनगुळे रस्ता खचला

Jul 29, 2024 - 11:19
Jul 29, 2024 - 14:24
 0
लांजातील कुवे-इंदवटी-वनगुळे रस्ता खचला

लांजा : लांजा तालुक्यातील कुवे इंदवटी-वनगुळे रस्ता पावसात खचल्यामुळे हा रस्ता वाहतूकीस धोकादायक ठरत आहे. त्यामुळे संबंधित रस्त्याची तातडीने डागडुजी करण्याची मागणी होत आहे. हा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून दोन वर्षापूर्वीच करण्यात आला आहे. वनगुळेच्या पुढे डावरे येथे हा रस्ता खचल्यामुळे वाहतुकीस रस्ता धोकादायक बनला आहे. संबंधित यंत्रणेकडून या रस्त्याची तत्काळ पाहणी करून रस्ता तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:47 PM 29/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow