रत्नागिरी : मारुती मंदिर ते माळनाका परिसरात रस्ता सपाटीकरण

Jul 9, 2024 - 10:01
Jul 9, 2024 - 14:06
 0
रत्नागिरी : मारुती मंदिर ते माळनाका परिसरात रस्ता सपाटीकरण

रत्नागिरी : शहरामध्ये मारुती मंदिर ते माळनाका दरम्यान खड्डे पडल्याने रस्त्यावर करण्यात आलेल्या डांबरीकरणाचा पट्टा जेसीबीच्या मदतीने काढून टाकण्याचे काम शनिवारी हाती घेण्यात आले. यामुळे खड्यांच्या त्रासापासून मुक्तता होईल, अशी आशा नगर परिषद प्रशासनाने व्यक्त केली. मारुती मंदिर ते माळनाका दरम्यान, रस्त्यावर मे महिन्यात करण्यात आलेल्या डांबरीकरण थराला मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने, नागरिकांमधून तीव्र भावना व्यक्त करण्यात येत होत्या. त्यामुळे पालकमंत्री उदय सामंत यांनी तातडीने याबाबत निर्णय घेण्याच्या सूचना न. प. प्रशासनाला दिल्या होत्या. नागरिकांचे होणारे हाल थांबवण्यासाठी थेट जेसीबीच्या मदतीने खड्डे पडलेल्या भागाचा डांबरीकरणाचा थर काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.

शनिवारी दुपारपासून या कामाला  सुरुवात झाली असून, सायंकाळी उशिरापर्यंत डांबरीकरण उखडून टाकण्यात येऊन रस्ता सपाटीकरण करण्यात येत होते. हे काम भर पावसातही सुरू होते.

सामान्यांसह रुग्णांचेही हाल 
या कामामुळे दिवसभर मारुती मंदिर परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. दुपारी दोन रुग्णवाहिकाही यात अडकून पडल्या होत्या. शेवटी रुम्णवाहिका चालकांनी ट्रैफिक जैममधून मार्ग काढत रुग्णांना रुग्णालयात पोहचवले, मात्र सायंकाळीही ट्रॅफिक जॅमची समस्या उद्‌भवली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:29 PM 09/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow