रत्नागिरी शहरातील रस्त्यांवरील खडी पालिका कार्यालयासमोर टाकणार : नीलेश आखाडे

Jul 10, 2024 - 11:26
 0
रत्नागिरी शहरातील रस्त्यांवरील खडी पालिका कार्यालयासमोर टाकणार : नीलेश आखाडे

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर ठोस उपाययोजना झाली नाही, तर रस्त्यांवरील खडी पालिका कार्यालयासमोर आणून टाकण्याचे आंदोलन करण्याचा इशारा भाजप आयटी जिल्हा संयोजक नीलेश आखाडे यांनी दिला आहे.

रत्नागिरी शहरातील अनेक प्रश्न जैसे थे आहेत. शहरातील मुख्य रस्त्यांबरोबर अंतर्गत रस्त्यांचीदेखील दुरवस्था झाली आहे. वेगवेगळ्या कारणाxvr खोदण्यात आलेले चरदेखील बुजवण्यात आलेले नाहीत. याबाबत रत्नागिरी नगरपालिकेकडे व्यवस्थाही नसल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षभरामध्ये रत्नागिरी शहरातील मुख्य रस्ता साधारणपणे दोन ते तीन वेळा करण्यात आला. मात्र तरीदेखील या रस्त्यांवरील खडी वर येऊन या रस्त्यांवर मोठे मोठे खड्डे पडले आहेत. दररोज या रस्त्यावर अपघात घडत आहेत. दुचाकी वाहनचालकांना याचा प्रचंड त्रास होत असून, दुचाकी गाड्या खडीवरून घसरून अपघात होत आहेत.

नगरपालिका प्रशासनाने दोन ते तीन वेळा रस्ते करूनदेखील रस्त्यांची ही अवस्था होत असेल तर याबाबत नेमके दोषी कोण, याची जबाबदारी कोण स्वीकारणार, हे जाहीर करावे आणि रस्त्यांवर वर आलेली ही खडी त्वरित उचलून रत्नागिरीच्या नागरिकांना रस्त्यांची किमान दुरुस्ती करून दिलासा द्यावा, असे श्री. आखाडे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

येत्या आठ दिवसांत याबाबत उपाययोजना न झाल्यास संपूर्ण शहरातील रस्त्यावरील खडी नगरपालिका कार्यालय बाहेर आणून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा श्री. आखाडे यांनी दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 10-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow