रत्नागिरी : जिल्ह्यात पिकविमा अर्जाची १५ जुलैपर्यंत अंतिम मुदत

Jul 11, 2024 - 14:36
Jul 11, 2024 - 15:00
 0
रत्नागिरी : जिल्ह्यात पिकविमा अर्जाची १५ जुलैपर्यंत  अंतिम  मुदत

रत्नागिरी : प्रधानमंत्री पिकविमा योजनेतर्गत खरीप हंगामात भात व नाचणी पिकांचा समावेश केला असून, आतापर्यंत २ हजार १२७ शेतकऱ्यांनी ४७७.५७ हेक्टरवरील विमा उतरवला आहे विमा उतरवण्यासाठी १५ जुलैपर्यंत अंतिम मुदत असून, शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.

सर्वसमावेशक पीकविमा योजना राज्यात दरवर्षी राबवण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना १ रुपयात अर्ज भरून पीकविमा पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे. भातपिकासाठी संरक्षित रक्कम हेक्टरी ५० हजार रुपये तर नाचणी पिकासाठी २० हजार आहे. कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिलेले आहे. हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणाऱ्या नुकसानीचा लाभ मिळतो. पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इ. बाबींमुळे हंगामाच्या शेवटी उत्पन्नात येणारी घट होत आहे. नैसर्गिक आपत्ती, काढणीपश्चात होणाऱ्या नुकसानीचा लाभ दिला जाणार आहे.

गेल्या काही वर्षांत अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांना विमा लाभ मिळत आहे. त्यामुळे विमा उत्तरवणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यातील २ हजार १२७ शेतकऱ्यांनी विमा उतवलेला आहे. त्यामध्ये खेड तालुक्यात सर्वाधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. लांजा तालुक्यात सर्वात कमी शेतकरी या योजनेत सहभागी झाले आहेत. रत्नागिरी तालुक्यात विमा उत्तरवणाऱ्या शेतकऱ्यांचा टक्का अधिक होता; मात्र यंदा चित्र वेगळे दिसत आहे.

दरम्यान, या योजनेचा विमा हप्ता भरण्याचा कालावधी १५ जून ते १५ जुलै २०२४ आहे तरी विमा अर्ज आपले सरकार सेवा केंद्र (CSC), बैंक तसेच www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा आहे. अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांगरे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:23 PM 11/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow