खेड : गणेशोत्सवासाठी मुंबईतून एसटीच्या जादा १५ फेऱ्या

Jul 11, 2024 - 11:17
Jul 11, 2024 - 15:19
 0
खेड : गणेशोत्सवासाठी मुंबईतून एसटीच्या जादा १५  फेऱ्या

खेड : गणेशोत्सवात धावणाऱ्या जादा गणपती स्पेशल एसटी फेऱ्यांचे आरक्षण प्रशासनाने ४ जुलैपासून खुले केल्यानंतर गणेशभक्तांच्या नजरा जादा बसफेऱ्यांकडे लागले होते. त्यानुसार कोकण मार्गावर ४ सप्टेंबरपासून १५ जादा बस धावणार आहेत. यंदा गणेशोत्सवाची ७ सप्टेंबरपासून धामधूम सुरू होणार आहे. कोकण मार्गावरून धावणाऱ्या सर्वच नियमित गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले. अखेर एसटी प्रशासनाने १५ जादा बसफेऱ्या जाहीर केल्याने आरक्षित तिकिटे मिळवण्यासाठी बसस्थानकातील तिकीट खिडक्यांवर झुंबड उडत आहे. 

४ सप्टेंबरपासून झुंबड उडत आहे. ४ सप्टेंबरपासून कोकणात सायंकाळी ६ वा. कल्याण- कणकवली, ६.३० वा. कल्याण -राजापूर, रात्री १० वा. कल्याण- चिपळूण, ९ वा. कल्याण-गुहागर, कल्याण-दापोली, सायं. ७ वा. विठ्ठलवाडी-राजापूर, रात्री ८.४५ वा. विठ्ठलवाडी-रत्नागिरी, सायं. ७.१५ वा. विठ्ठलवाडी-जैतापूर, रात्री ८.३० वा. विठ्ठलवाडी-साखरपा, ८.१५ वा. विठ्ठलवाडी-देवरुख, सायं. ७ वा. विठ्ठलवाडी-गुहागर, रात्री ८.४५ वा. विठ्ठलवाडी-चिपळूण, ८.१५ वा. विठ्ठलवाडी-दापोली, रात्री ९.४५ वा. विठ्ठलवाडी-खेड, सकाळी ११.३० वा. विठ्ठलवाडी-शिवतरघळ आदी जादा बसफेऱ्या जाहीर केल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:44 PM 11/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow