राजापूरला शासकीय इमारतींसाठी १० कोटी ९५ लाखांचा निधी मंजूर

Jul 26, 2024 - 11:41
Jul 26, 2024 - 15:51
 0
राजापूरला शासकीय इमारतींसाठी १० कोटी ९५ लाखांचा निधी मंजूर

राजापूर : शहरातील महसूल मंडळ अधिकारी कार्यालयाच्या बांधकामासाठी दीड कोटी, तर तालुक्यातील ग्रामीण भागातील ६३ तलाठी सजा कार्यालयांच्या इमारत बांधकामांसाठी ९ कोटी ४५ लाख असा एकूण सुमारे १० कोटी ९५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर यांनी दिली.

राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून अर्थसंकल्पात तालुक्याला भरघोस निधीची तरतूद झाल्याची माहिती नागरेकर यांनी पत्रकारांना दिली. ते म्हणाले, 'तालुक्यातील महसूल प्रशासनात कामाला येणाऱ्या जनतेला चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून पालकमंत्री उदय सामंत, खासदार नारायण राणे यांनी यासाठी विशेष शिफारस केली होती तर, महायुती शासनाच्या माध्यमातून तालुक्याला निधी उपलब्ध होण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, महिला प्रदेश सरचिटणीस शिल्पा मराठे, जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर, तालुकाध्यक्ष सुरेश गुरव, भास्कर सुतार, महिला तालुकाध्यक्षा सुयोगा जठार यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे राजापूर मंडळ अधिकारी कार्यालयासह ६३ तलाठी सजा कार्यालयांच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध झाला आहे. आता महसूल प्रशासनातील मंडळ अधिकारी, तलाठी यांना हक्काच्या प्रशस्त इमारतीत बसून काम करता येणार आहे. गावपातळीवर असलेल्या तलाठी कार्यालयांच्या इमारती बांधकामासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत आपण तहसीलदार शीतल जाधव यांच्याशी चर्चा केली असून त्याबाबत कार्यवाही केली जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

गावच्या वैभवातही पडणार भर
गावपातळीवर तलाठी कार्यालयाची नवीन इमारत उभी राहिली तर गावच्या वैभवातही भर पडणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी गावपातळीवर पुढाकार घेऊन जागा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन नागरेकर यांनी केले. या निधीतून तालुक्यातील महत्त्वपूर्ण अशा प्रशासकीय कार्यालय निर्मितीच्या कामाला चालना मिळणार आहे, असे बांधकाममंत्री चव्हाण यांनी सांगितले.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:09 PM 26/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow