राजापूर तालुक्याला रस्ते, पूल कामांसाठी १६ कोटी ८६ लाखांचा निधी मंजूर

Jul 24, 2024 - 12:01
Jul 24, 2024 - 12:20
 0
राजापूर तालुक्याला रस्ते, पूल कामांसाठी १६ कोटी ८६ लाखांचा निधी मंजूर

राजापूर : राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून राज्याच्या अर्थसंकल्पातून तालुक्याला १६ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी रस्ते आणि पुलांसाठी मंजूर झाल्याची माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर यांनी दिली.

खरवते कळसवली रस्ता, रायपाटण गांगणवाडी ते कदमवाडी, खाडेवाडी रस्ता, फुफेरे लिगमवाडी रस्ता, गोठणे तिसेवाडी रस्ता, पडवे-वालमवठार रस्ता, मौजे ओणी मोडकवाडी लहान लहानपुलाचे बांधकाम, मोसम धुरीवाडी लहान पुलाचे बांधकाम व जोडरस्ता, आंगले सरवणकरवाडी राऊतवाडी भुवडवाडी ते फुफेरे हेल्थ सेंटर रस्ता, तिवंदामाळ-चुनाकोळवण रस्ता, पाटवली-कुंभारवाडी रस्ता, धारतळे मोगरे राजवाडी रस्ता, गोठणे ओणी दैतवाडी रस्ता, रानतळे ते धोपावर गुरववाडी रस्ता, हातदे-आजिवली रस्ता, वाडातिवरे-पडवणे रस्ता, कोतापूर-भालावली रस्ता, मिठगवाणे- कांचनवाडी सुवर्णवाडी रस्ता, शिवणे बु. गुरववाडी रस्ता, पेंडखळे-संकेश्वर मंदिर रस्ता, कणेरी मुख्य रस्ता से ब्राह्मणवाडी, बौद्धवाडीकडे जाणारा रस्ता, गोठणे-नाचणेकरवाडी, सागवे वरचे बुरंबेवाडा रस्ता, नेरवाडी तिसेवाडा तरळवाडी रस्ता, पन्हळेतर्फ राजापूर- कपलवाडी, चिखले-चिराटवाडी रस्ता, भालावली-बौद्धवाडी रस्ता, मुन्सिपल हर ते कोदवली-मांडवकरवाडी रस्ता, कारिवणी-चांदवण रस्ता, धारतळे भालावली चव्हाटा रस्ता, पडवे नवलादेवी मंदिर ते जितणेश्वर मंदिर रस्ता, पेंडखळे विपटेवाडी किनरेवाडी रस्ता, कशेळो बांध ते आगवेकरवाडी रस्ता, परुळे धरण रस्ता लहान पुलाचे बांधकाम करणे, ओशीवळे मुस्लिमवाडी ते बागवेवाडी रस्ता, गोवळ गुरववाडी रस्ता या कामांचा समावेश आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 PM 24/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow