शासनाच्या अनास्थेमुळे शिरगाव पिंपळवाडी धरण प्रकल्प रखडला : सदानंद भोसले

Jul 12, 2024 - 10:27
Jul 12, 2024 - 14:28
 0
शासनाच्या अनास्थेमुळे शिरगाव पिंपळवाडी धरण प्रकल्प रखडला : सदानंद भोसले

खेड : शासनाची अनास्था व लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष यांच्या कचाट्यात खेड तालुक्यातील शिरगाव पिंपळवाडी हा डुबी नदी वरील धरण प्रकल्प रखडला आहे . दोन्ही बाजूला असलेल्या कालव्यांचे काम संथ गतीने सुरू असून दरवर्षी कोट्यवधीचा निधी प्राप्त होतो, मात्र भरीव आर्थिक निधीची तरतूद व योग्य ठेकेदार लाभत नसल्याने दुतर्फा असलेल्या कालव्यांचे काम संथ गतीने सुरू असून अजून किती कालावधी हे काम पूर्ण होण्यासाठी लागेल हे नक्की सांगता येत नाही, अशी प्रतिक्रिया येथील सामाजिक कार्यकर्ते, मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंद भोसले यांनी दिली.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, मंडणगड, दापोली हे तालुके भौगोलिकदृष्ट्या दऱ्याखोऱ्यातील दुर्गम भू भागात गणले जातात. शासकीय योजनांच्या विकासाबाबत अद्याप पुर्णतः मागासलेले म्हणून नोंद घ्यावी लागेल. काही प्रमाणात विकास व निधीबाबत ढोल बडवले जातात, मात्र अजून विकास दृष्टीक्षेपात दिसत नाही. खेड तालुक्यातील एकमेव धरण प्रकल्प कूर्मगतीने का होईना पूर्णत्वास नेला व खेड तालुक्यातील अनेक प्रकल्पांना शासकीय मंजुरी मिळाल्या. 

मात्र ५ कोटीचा पिंपळवाडी डुबी नदीवरील प्रकल्प १०० कोटीच्या घरात जावून देखील अपूर्ण आहे. धरण प्रकल्प पुर्ण झाला असला तरी धरणाच्या डाव्या उजव्या बाजूस कालव्यांची कामे अद्याप अपुरी आहेत. याबाबत भोसले यांनी आपण या कामी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर सांगितले. करणार असल्याचे सध्या खेड तालुक्यातील सात ते आठ प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून निधी अभावी कामे ठप्प आहेत. त्यासाठी थोडाफार निधीची तरतूद करण्यात शासनास भाग पाडले तरी कामास गती येईल.

मात्र राजकीय पक्षांतील नेत्यांकडे ग्रामीण विकासाबाबत अनास्था जाणवते. स्थानिक समस्यांबाबत विविध विचारांच्या नेतृत्वात एकवाक्यता झाल्यास डूबी प्रकल्पच काय अनेक प्रकल्प कार्यान्वित होऊन हा प्रदेश सुजलाम् सुफलाम् होईल, यासाठी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांची शिष्टमंडळासह भेट घेणार असल्याचे सदानंद भोसले यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:51 PM 12/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow