मंडणगडमध्ये खरीप क्षेत्रात २६५ हेक्टरने वाढ

Jul 13, 2024 - 12:31
Jul 13, 2024 - 16:32
 0
मंडणगडमध्ये खरीप क्षेत्रात २६५ हेक्टरने वाढ

मंडणगड : तालुक्यात यंदा २ हजार ९१६ हेक्टर इतके क्षेत्र पिकाखाली येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले. त्यात भात, नाचणी, वरी या मुख्य पिकांसह तीळ, उडीद इत्यादी पिकांचा समावेश आहे. २०२३ ला तालुक्यातील २६५१ हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात विविध पिके घेतली गेली होती. यंदा २६५ हेक्टर इतके क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.

जुलैमध्ये समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामातील शेतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. यंदा मान्सूनच्या सुरुवातीपासूनच चांगला पाऊस सुरू आहे. आज अखेरपर्यंत तालुक्यात १४४८.९८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रोहिणी नक्षत्रापासून पावसाने सातत्य राखल्यामुळे शेतीची कामे रेंगाळलेली नाहीत. २०१० पासून पुढील कालावधीत समाक्षरी साडेपाच हजार हेक्टर क्षेत्र लागवड होते. त्यात सातत्याने घट होत गेली आहे. तालुक्यात यंदा २ हजार ९१६ हेक्टर इतके क्षेत्र पीकाखाली येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले, त्यात भात, नाचणी, वरी या मुख्य पिकांसह तीळ, उडीद आदी पिकांचा समावेश आहे. 

२०२३ ला तालुक्यातील २६५१ हेक्टर क्षेत्रावर खरिपातील पिकांची लागवड झाली होती, जंगली श्वापदांचा उपद्रव, पर्यावरणात बदल व विविध कारणांनी घटलेले शेतीचे उत्पादन, नापिकी, कुशल-अकुशल मनुष्यबळाचा अभाव व उदरनिर्वाहाकरिता महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेले स्थलांतर यामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात आल्याने शेतीखालील क्षेत्र कमी होत आहे. तालुक्याची मुख्य आर्थिक स्रोत आजही शेती व शेतीपुरक व्यवसायांवर अवलंबून आहे. श्रमिक घटकाकडील जमिनीचे प्रमाण अत्यल्प असून, कृषी विभाग उदासीन आहे.

फळ लागवडीकडील कल वाढता
खरीप हंगामात तालुक्यात पारंपरिक शेतीसह आधुनिक यंत्रांचाही वापर होत आहे. खरीप हंगामात पारंपरिक पिके घेण्यात घट होत असताना आंबा, काजू, फणस, कोकम या नगदी उत्पादन देणाऱ्या फळ लागवडीकडील शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे. त्यामधून कायमस्वरूपी उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी तिकडे वळत असल्याचे शेतकरी सांगत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:59 PM 13/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow