Konkan Rain : कोकणातल्या नद्यांना पूर..

Jul 15, 2024 - 11:40
 0
Konkan Rain : कोकणातल्या नद्यांना पूर..

रत्नागिरी : कोकणातल्या(Konkan Rain) नद्यांना महापूर आला आहे, रोह्यात कुंडलिका,खेडध्ये जगबुडी आणि नारंगी, नागोठण्यामध्ये अंबा नदी वाहतेय धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. रात्रभर सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे.

आज सकाळी 8 वाजता कुंडलिका, पाताळगंगा आणि अंबा नद्यांनी इशारा पातळी ओलांडली. रोहा, नागोठणे, खालापूर, खोपोली, आणि आपटा परिसरातील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. खेड-दिवाणखवटी येथे नदीला पूर आल्याने सात गावांचा संपर्क तुटला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्यातील तेरेखोल नदी इशारा पातळीवर वाहत आहे. तर जिल्हयात इतर नद्या दुतडी भरून वाहत आहेत. जिल्हयात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहेत. जिल्हयात आज रेड अलर्ट च्या पार्श्भूमीवर एन डी आर एफ च्या दोन तुकड्या जिल्ह्यात तैनात करण्यात आल्या आहेत .

चिपळूणमध्ये मुसळधार पावसाने वाशिष्ठी नदीला पूर

चिपळूणमध्ये मुसळधार पावसाने वाशिष्ठी नदीला पूर आला आहे. चिपळूण मधील मुंबई गोवा महामार्गावर नदीचे स्वरूप तर शहरातील सखलभागात पाणी साचण्यास सुरुवात. झाली आहे. प्रशासनाकडून चिपळूण मधील रहिवाशांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहे. अति महत्त्वाचे काम असेल तरच बाहेर पडण्याचे प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे.

रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण भागात देखील पावसाचा जोर वाढला

रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण भागात देखील पावसाचा जोर वाढला आहे. राजापूर शहराजवळून वाहणाऱ्या कोदवली आणि अर्जुना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाला आहे. राजापूर नगरपरिषदेकडून व्यापाऱ्यांना धोक्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांसह सर्वांना सतर्कतेचं आवाहन केले आहे. वादळी वाऱ्यासह बरसतोय जोरदार पाऊस पडत आहे. काही भागात विजेचा लपंडाव सुरू तर काही ठिकाणी वीज गायब आहे.

खेड दापोली मार्ग बंद

रत्नागिरीत अखिल जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे. नारंगी व इतर नद्यांनी देखील आपली पातळी ओलांडली आहे. यामुळे खेड दापोली मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने म्हणजे कुंभारवाडा डेंटल कॉलेज या मार्गे वळवण्यात आली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास खेड शहरात पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. जुलै महिन्यात तब्बल दुसऱ्यांदा धोका पातळी देखील ओलांडली आहे. यामुळे शहरवासीयांच्या डोक्यावर पुराची टांगती तलवार कायम आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 15-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow