राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा आजपासून

Jul 15, 2024 - 11:46
 0
राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा आजपासून

पुणे : ७१ व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा आजपासून पुण्यात होत असून मुंबई शहर पश्चिम विरुद्ध औरंगाबाद, परभणी विरुद्ध पिंपरी-चिंचवड या पुरुषांच्या सामन्याने स्पर्धेला प्रारंभ होईल.

बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशन व पुणे जिल्हा कबड्डी असो. यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बाणेर, पुणे येथे दि. १५ ते २० जुलै २०२४ या कालावधीत पुरुष व महिला गटाच्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. मॅटच्या ५ क्रीडांगणावर पुरुषांचे सामने खेळविण्यात येतील. खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज (सोमवार) दुपारी ३ वाजता या स्पर्धेचे उ‌द्घाटन होईल. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनशी संलग्न असलेले २५ जिल्ह्यांचे महिला व पुरुष संघ तसेच अ व ब दर्जा प्राप्त महानगरपालिका हद्दीतील ठाणे जिल्हा शहर व ग्रामीण, मुंबई शहर मध्य व पश्चिम, मुंबई उपनगर मध्य व पश्चिम, नाशिक जिल्हा शहर व ग्रामीण, पुणे जिल्हा शहर व ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड शहर असे एकूण ३१ संघ सहभागी होणार आहेत.

स्पर्धेची पुरुष विभाग गटवारी खालीलप्रमाणे :
ए गट : १) मुंबई शहर पश्चिम, २) पालघर, ३) औरंगाबाद.
बी गट : १) अहमदनगर, २) रायगड, ३) सोलापूर, ४) ठाणे.
सी गट : १) मुंबई उपनगर पूर्व, २) परभणी, ३) उस्मानाबाद, ४) पिंपरी-चिंचवड.
डी गट : १) नांदेड, २) लातूर, ३) बीड, ४) पुणे शहर.
इ गट : १) रत्नागिरी, २) नंदुरबार, ३) जळगाव, ४) नाशिक.
एफ गट : १) धुळे, २) ठाणे ग्रामीण, ३) सिंधुदुर्ग, ४) मुंबई उपनगर पश्चिम.
जी गट : १) नाशिक शहर, २) पुणे ग्रामीण, ३) हिंगोली, ४) मुंबई शहर पूर्व.
एच गट : १) सांगली, २) कोल्हापूर, ३) सातारा, ४) जालना.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 PM 15/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow