अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या एनएसएसच्या स्वयंसेवकांनी घेतला भात लावणीचा अनुभव

Jul 15, 2024 - 16:01
 0
अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या एनएसएसच्या स्वयंसेवकांनी घेतला भात लावणीचा अनुभव

रत्नागिरी : येथील अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी भातलावणीचा अनुभव घेतला.

एनएसएस विभागात अकरावी-बारावीचे १०० स्वयंसेवक समाजोपयोगी उपक्रमात नियमित सहभागी होत असतात.

स्वच्छता अभियान, विविध समाजजागृती फेऱ्या, श्रमदान, वृक्षारोपण, बंधारे बांधणे, पथनाट्ये अशा समाजाभिमुख उपक्रमांत सहभागी होऊन स्वयंसेवक व्यक्तिमत्त्व विकास साधतात.

भारत हा शेतीप्रधान देश आहे. प्रत्येक नागरिकाला शेतीचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे भातलावणी करणे या नावीन्यपूर्ण उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे बारावीचे २५ स्वयंसेवक सहभागी झाले. रत्नागिरीशेजारच्या शिरगावमधील शिवरेवाडीत किशोर लिंगायत यांच्या शेतात मुलांनी भाताची लावणी केली.

यावेळी मुलांनी भाताचे विविध वाण, पिकाचा कालावधी, रोप काढणे, बांध घालणे, पॉवर टिलर चालविणे, शेणखत घालणे, जमीन समतल करुन रोप लावणे याची माहिती घेतली. सेंद्रिय खतासोबत थोड्या प्रमाणात रासायनिक खत कसे वापरायचे, याच ज्ञान त्यांनी घेतल. शेतात काम करताना पारंपरिक गाणीसुद्धा मुलांनी गायिली. ग्रामस्थांनी आणि प्रसाद गुरव यांनी भातलावणीसंदर्भात मार्गदर्शन केले.

हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. निनाद तेंडुलकर, प्रा. अभिजित भिडे, प्रा. स्मिता पाथरे, प्रा. स्नेहा बाणे यांनी मेहनत घेतली.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:48 15-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow