चिपळुणात सर्व्हर डाऊनमुळे ६ हजार दाखले मंजुरीच्या प्रतीक्षेत
चिपळूण : सर्व्हर डाऊनमुळे चिपळूण तालुक्यातील सहा हजारहून अधिक दाखले मंजुरीविना रखडले आहेत. शाळा, महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी हे दाखले अत्यावश्यक असून, यामुळे अनेक जण चिपळूण तहसील व सेतू कार्यालयात फेऱ्या मारत आहेत.
दरवर्षी शाळा, महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी जून, जुलै महिन्यामध्ये दाखल्यांसाठी मोठी गर्दी होत असते; परंतु दरवर्षी याच महिन्यामध्ये सर्व्हर डाऊन होतो. यावर्षी त्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही योजना शासनाने जाहीर केल्याने दाखल्यांसाठी अचानक मागणी वाढली. याचा परिणाम सर्व्हरवर झाल्याने सर्वच दाखले रखडत आहेत.
चिपळूण तालुक्यात तब्बल सहा हजारहून अधिक दाखल्यांना मंजुरी मिळणे बाकी आहे. यामध्ये सर्वात जास्त संख्या उत्पन्नाच्या दाखल्यांची आहे. शाळा, महाविद्यालयांसाठी उत्पन्न, डोमिसाईल, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलेअर, क्रिमिलेअर, महिला आरक्षण व अन्य दाखल्यांची गरज असते. नागरिकांनी हे दाखले मिळविण्यासाठी सेतू किंवा अन्य ठिकाणी अर्ज दाखल केलेले आहेत. मात्र, सर्व्हर डाऊनमुळे हे दाखले मोठ्या प्रमाणात मंजुरीविना रखडले आहेत. शासनाने याबाबत गांभीयनि दखल घेणे गरजेचे आहे. या २ महिन्यांत दाखल्यांसाठी गर्दी होत असते. मात्र, दाखले न मिळाल्याने अनेक विद्यार्थी, पालक तहसीलदार कार्यालयात फेऱ्या मारत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:40 PM 17/Jul/2024
What's Your Reaction?