रत्नागिरी : दामले विद्यालयात आषाढी वारी उत्साहात साजरी

Jul 18, 2024 - 10:29
Jul 18, 2024 - 14:32
 0
रत्नागिरी : दामले विद्यालयात आषाढी वारी उत्साहात साजरी

रत्नागिरी : नगरपालिका शाळा क्र. १५, दामले विद्यालयातील बालदोस्तांनी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वारकरी दिंडीचा आनंद घेतला. या दिंडीत सुमारे पाचशे विद्यार्थी सहभागी झाले. विठ्ठल-रखुमाईच्या पोशाखातील बालदोस्तांना पाहण्याचा आनंद अवर्णनीय होता. दरवर्षीप्रमाणे यावर्षी बालवाडी विभागाने या दिंडीचे आयोजन केले. पालखीत बसलेल्या विठू माऊलीची बालदोस्तांनी वाजतगाजत दिंडी काढली. नऊवारी साड्या आणि पांढरा झब्बा, लेंगा अशा वारकरी पोशाखातील चिमुकल्यांनी आनंदोत्सव साजरा केला. मुख्याध्यापिका निलम जाधव व बालवाडी विभागप्रमुख रश्मी लेले यांच्या मार्गदर्शनाखाली या दिंडीचे आयोजन करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:58 PM 18/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow