लांजा : केळंबे येथे परसबागेत धनेशची जोडी बनली पर्यटकांचे आकर्षण

Jul 19, 2024 - 11:29
Jul 19, 2024 - 15:32
 0
लांजा : केळंबे येथे परसबागेत धनेशची जोडी बनली पर्यटकांचे आकर्षण

लांजा : धनेश संवर्धनासाठी जिल्ह्यातील पक्षीप्रेमी विशेष प्रयत्न करत आहेत. त्यांना तालुक्यातूनही चांगली साथ मिळत आहे. केळंबे (ता. लांजा) येथील नितीन कदम यांच्या परसबागेत धनेशची नर-मादी जोडी पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. धनेशच्या वावरामुळे पक्षीप्रेमीही सुखावले असून, त्यांचे संवर्धन करण्यासाठी सर्वच सरसावले आहेत.

धनेश या पक्ष्याला इंग्रजीमध्ये हॉर्नबिल असे म्हटले जाते. अतिशय सुंदर रंगांमुळे हा पक्षी लक्ष वेधून घेतो. धनेश निसर्ग मित्रमंडळाने संवर्धनासाठी जिल्ह्यात प्रयत्न सुरू केले आहेत. आतापर्यंत रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध प्रकारची फळे हे त्याचे मुख्य खाद्य आहे. झाडाच्या ढोलीत तो घरटे बांधतो व चिखलाने झाकून टाकतो व पिल्लांसाठी केवळ अन्न देता येईल एवढी एकच लहान उभी फट ठेवतो. या फटीतून पिल्लांना चारा पुरवला जातो. हा पक्षी भारतातील केरळ आणि अरूणाचल प्रदेश आणि म्यानमारमधील चीनचा राज्यपक्षी आहे तसेच भारतात पक्ष्यांवर संशोधन करणाऱ्या अग्रणी संस्था बीएनएचएस या संस्थेचे मानचिन्ह आहे. या पक्ष्यांची चोच फार मोठी व शिंगासारखी असल्यामुळे यांना इंग्रजी भाषेत हॉर्नबिल हे नाव दिलेले आहे. या पक्ष्यांचे एकंदर स्वरूप असामान्य असते.

भारतात धनेशाच्या पाच-सहा जाती आहेत. मोठ्या धनेशाची लांबी सुमारे १३० सेंमी. असते. डोके, पाठ, छाती वा पंख काळे असून पंखांवर आडवा पांढरा पट्टा असतो. मान व पोट पांढरे असते. शेपटी लांब व पांढरी असून, तिच्या टोकाजवळ काळा आडवा पट्टा असतो. नराचे डोळे तांबडे व मादीचे पांढरे असतात. चोच मोठी मजबूत, बाकदार व पिवळी असते. डोके आणि चोचीचे बूड यांवर एक मोठे शिरखाण असते. त्याचा रंग पिवळा असून, वरचे पृष्ठ खोलगट असते. पायांचा रंग काळपट असतो. हा अरण्यात राहणारा पक्षी असून फार मोठ्या व उंच झाडांवर लहान थवे करून ते राहतात. याच्या असामान्य स्वरूपामुळे तो सहसा नजरेतून सुटत नाही. उडत असताना याच्या पंखांचा होणारा आवाज दीड किमीवर तरी ऐकू जातो. झाडावर स्वस्थ न बसता हे ओरडून गोंगाट करत असतात.

सर्वभक्षी अशी ओळख
फायकस कुलातील वड, पिंपळ अशी फळे हा जरी यांचा मुख्य आहार असला तर ते किडे, सरडे किंवा इतर अन्न खात असल्यामुळे धनेश सर्वभक्षी म्हणता येईल. फळे किंवा इतर खाद्यपदार्थ खाण्याची यांची रित मोठी विलक्षण आहे. ते पदार्थ चोचीने वर उडवून आ वासतात व तो घशात पडला म्हणजे गिळतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:58 PM 19/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow