चिपळूण : मिरजोळी मार्गावर पडलेले खड्डे तातडीने बुजवावेत

Jul 20, 2024 - 10:07
Jul 20, 2024 - 15:26
 0
चिपळूण : मिरजोळी मार्गावर पडलेले खड्डे तातडीने बुजवावेत

चिपळूण : गुहागर-विजापूर मार्गावर चिपळूणनजिक मिरजोळी येथे मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. पावसाचे पाणी खड्डात साचत असल्यामुळे खड्डे दिसून येत नाहीत. अशामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. याची दखल घेत शिवसेना युवासेना पदाधिकारी यांनी राष्ट्रीय महामार्ग ऑफिसवर धडक देत ठेकेदार तसेच राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांना जाब विचारला.

यावेळी उबाठा शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले होते. नुसते खड्डे बुजवू नका, कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना निकृष्ट कामाचाही जाब विचारला. पावसाळ्यात वारंवार एकाच ठिकाणी खड्डे पडत असल्याने ही समस्या कायमस्वरूपी दूर करावी, तसेच पुन्हा असे प्रकार घडू नयेत, असा इशाराही देण्यात आला. पदाधिकाऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अधिकाऱ्यांनी मागण्या मान्य करीत पाऊस कमी झाला की, या मार्गाची उंची वाढवून रस्ता काँक्रिटीकरण करण्यात येईल. तसेच रस्त्यालगत गटारे करण्यात येतील, तसेच बंद झालेले नैसर्गिक नाले उघडण्यात येतील. तसेच सद्यस्थितीत खड्डे चांगल्याप्रकारे बुजविण्यात येतील, असे सांगितले.

यावेळी उबाठा युवासेना तालुका प्रमुख उमेश खताते, तालुका संपर्क प्रमुख अशोक नलावडे, युवासेना शहरप्रमुख पार्थ जागुष्टे, शिवसेना मालदोली विभाग प्रमुख नितीन निकम, उपविभाग प्रमुख फैयाज शिरळकर, कोंढे सरपंच शशी साळवी, युवासेना विभाग अधिकारी साहील शिर्के, शिरळ शाखा प्रमुख हेमंत मोरे, युवासेना उपशहर प्रमुख ओंकार गायकवाड, आकाश कदम, वाहतूक सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष ओंकार पंडित, युवासेनेचे राहुल गुरव, युवराज कांबळे आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 PM 20/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow