चिपळूण : आरती निराधार सेवा फाउंडेशन मालघर (गुरुकुल हायस्कूल)येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Jul 20, 2024 - 16:52
 0
चिपळूण : आरती निराधार सेवा फाउंडेशन मालघर (गुरुकुल हायस्कूल)येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

चिपळूण : आरती निराधार सेवा फाउंडेशन मालघर (गुरुकुल हायस्कूल)येथे अपरांत हॉस्पिटल, चिपळूण यांच्या माध्यमातून आज शिव आरोग्य सेनेचे जिल्हा समन्वयक रावळगाव चे सुपुत्र समाजसेवक श्री शशिकांत मारुती चव्हाण यांचा वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती शिवसेना तालुकाप्रमुख श्री जितेंद्र उर्फ पप्याशेट चव्हाण आणि डॉक्टर श्री उदयजी अवताडे सर, आरती फाउंडेशनच्या नाडकर्णी मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाकरिता अनेक मान्यवर उपस्थित होते. या शिबिरामध्ये 62 निराधार रुग्णांची तपासणी करण्यात आली.

शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांची तपासणी, त्यांना आहाराबद्दल मार्गदर्शन, ईसीजी, रक्तातील साखर, रक्तदाब, वजन, औषधे, त्यांच्या डोळ्यांची तपासणी, त्वचा रोग तपासणी, कर्करोग तपासणी, महिलांची तपासणी, शिबिरामध्ये मोफत करण्यात आल्या. पुढील मोतीबिंदू शस्त्रक्रिया किंवा पुढील तपासण्या किंवा ऑपरेशन पूर्णपणे मोफत करण्यात येतील. या कार्यक्रमाकरिता अनेक मान्यवर उपस्थित होते. अपरांत हॉस्पिटलचे डॉक्टर पालांडे मॅडम. डॉक्टर जाधव मॅडम. डॉक्टर शिंदे. त्वचारोग तज्ञ हॉस्पिटलचे अधिकारी सर्व सिस्टर जनसंपर्क अधिकारी अनेक मान्यवर उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते श्री शशिकांत चव्हाण हे करत असलेला आरोग्य सेवेबद्दल सर्वांनी गौरउद्गार काढले. पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आरती निराधार सेवा फाउंडेशन मालघर गावामध्ये निराधार लोकांची ज्या पद्धतीने सेवा करतात. ती सेवा खरोखरच कौतुकास्पद आहे. सर्वांनी आपलं कर्तव्य समजून या निराधार लोकांना आपल्या परीने आपल्याला जमेल तसे आधार द्यावा, अशा पद्धतीचे विचार श्री शशिकांत चव्हाण यांनी मांडले. त्याचप्रमाणे उपस्थित माजी सभापती श्री जितेंद्र चव्हाण यांनी आमदार भास्करराव जाधव यांच्या माध्यमातून आपणास निश्चित पुढील वाटचालीस चांगल्या प्रकारची मदत सहकार्य आम्ही साहेबांना सांगून निश्चित करू, आमच्या सर्व सहकाऱ्यांना अशा पद्धतीचा निराधार लोकांना मदत करण्याचा आव्हान करू, असे सांगितले. डॉक्टर अवताडे यांनीही तशाच प्रकारचा आवाहन केलं. आपण जगत असताना इतरांनाही मदत केली पाहिजे. हा संदेश आपण सर्वांनी आत्मसात करावा, आपलाही वाढदिवस हा निराधार लोकांबरोबर साजरा करावा, असा सर्वांनी निश्चय केला आहे. सर्व निराधार लोकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. खरंच खूप सर्वांना समाधान वाटले. एक दिवस समाजातील निराधार लोकांसाठी आपण दिला पाहिजे. सर्वांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:19 20-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow