दापोलीत एसटी बस गटारात कलंडली

Jul 22, 2024 - 10:43
 0
दापोलीत एसटी बस गटारात कलंडली

दापोली : दापोली बसस्थानकातून सकाळी सुटलेली फरारे - मोगरेवाडी बस ही असोंड येथे रस्त्यालगतच्या गटारात कलंडली. चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने ही बस गटारात फसली. 

बस एका बाजूला कलंडल्यामुळे प्रवाशांनी आरडाओरडा केला. त्यानंतर चालक आणि वाहकाने प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. ही घटना शनिवारी सकाळी घडली. यामुळे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 22-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow