चिपळूण : दामदुप्पट नफ्याच्या आमिषाने दोघांची साडेबावीस लाखांची फसवणूक

Jul 22, 2024 - 11:11
Jul 22, 2024 - 12:22
 0
चिपळूण : दामदुप्पट नफ्याच्या आमिषाने दोघांची साडेबावीस लाखांची फसवणूक

चिपळूण : चिपळूण शहर परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तब्बल साडेबावीस लाखांची आर्थिक फसवणूक झाली आहे. गुंतवणुकीवर जास्त फायदा मिळवून देतो असे आमिष दाखवून चिपळुणातील दोघांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांत चारजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पहिल्या घटनेत दिलनवाज करामत बेबल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अयुब अहमद परकार राहणार कालूस्ते खुर्द यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानुसार अयुब परकार यांनी २०२० पासून आपण गुंतवणूक केलेल्या रकमेवर दामदुप्पट फायदा मिळवून देऊ, असे सांगून तब्बल दहा लाख रुपये घेतले. सातत्याने दिलनवाज बेबल यांनी दुप्पट पैसे मिळणार म्हणून अयुब यांच्याकडे दहा लाख रुपये दिले. मात्र परतावा मिळत नसल्याचे लक्षात येतात आणि यामध्ये आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्यावर बेबल यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी अयुब प्रकार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

दुसऱ्या घटनेत अर्जुनकुमार जापान छोटेराय यांची देखील साडेबारा लाखांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी करिना देसाई, संजय आपटे व अन्य एका अज्ञाताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. चिपळूण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जुन कुमार छोटे राय यांना या तीन लोकांकडून फोन आले व आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे त्यांनी आमिष दाखविले. त्यावर विश्वास ठेवून २०२० पासून आतापर्यंत बारा लाख ५८ हजार रुपये या तिघांच्या खात्यात पाठवून दिले. परस्परांशी संगनमत करून या तिघांनी आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास चिपळूण पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 PM 22/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow