किरण सामंत यांनी केली खोरनिनको धरणाची पाहणी

Jul 22, 2024 - 13:46
 0
किरण सामंत यांनी केली खोरनिनको धरणाची पाहणी

रत्नागिरी : लांजा तालुक्यातील खोरनिनको येथील धरणाची पाहणी करून परिसरातील ग्रामस्थांच्या समस्या सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण ऊर्फ भैया सामंत यांनी जाणून घेतल्या. या समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. 

सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत यांनी शिवसेना पक्ष वाढीच्या दृष्टीने लांजा व राजापूर तालुक्यावर लक्ष केंद्रित केले असून, येथील समस्या सोडवण्यावर भर दिला आहे. ग्रामीण भागात फिरून ते ग्रामस्थांच्या समस्यांचा आढावा घेऊन त्या सोडवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देत आहेत, लांजा तालुक्याच्या सह्याद्रीच्या पट्ट्यात असणाऱ्या खोरनिनको या गावाला शनिवारी भेट देऊन किरण सामंत यांनी येथील धरणाची पाहणी केली. पर्यटनदृष्ट्या विकासाबरोबरच खोरनिनको गावच्या ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. या समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन देतानाच अधिकाऱ्यांनाही त्यांनी सूचना केल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:15 22-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow