विशाळगड येथील हिंसाचाराचा निषेध: प्रशांत यादव

Jul 22, 2024 - 10:57
Jul 22, 2024 - 14:00
 0
विशाळगड येथील हिंसाचाराचा निषेध: प्रशांत यादव

चिपळूण : विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याच्या मागणीवरून पेटलेल्या आंदोलनाने उग्र स्वरुप धारण केल्यामुळे उद्भवलेल्या हिंसाचारात विशिष्ठ समाजाला टार्गेट करुन समाजकंटकांनी जो धिंगाणा घातला. या घटनेबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत यादव यांनी निषेध केला आहे. ते म्हणाले की, विशाळगडावर अतिक्रमण झाले असेल तर ते काढलेच पाहिजे. त्याबाबत दुमत नाही. परंतु, या अतिक्रमणाशी काहीही संबंध नसताना विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावातील घरांवर झालेला भ्याड हल्ला नक्कीच निषेधार्ह आहे. निष्पाप लोकांवर आणि मशिदीवर अशा प्रकारे झालेला हल्ला म्हणजे हा पूर्वनियोजित कट असावा अशी शंका येते. त्यामुळे या हल्ल्याची सखोल चौकशी होऊन गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता, कोणत्याही समाजविघातक गोष्टीला बळी न पडता आपण एकजुटीने सामाजिक, धार्मिक शांतता टिकून राहील, यासाठी कटीबद्ध राहू आणि विशाळगड प्रकरणात अन्याय झालेल्या ग्रामस्थाना न्याय मिळवून देऊ, असे यादव यांनी सांगितले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:26 PM 22/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow