अंत्योदय योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवा : बाळ माने

Jul 22, 2024 - 11:32
Jul 22, 2024 - 14:43
 0
अंत्योदय योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवा : बाळ माने

रत्नागिरी : केंद्र व राज्य शासनाकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना सुरु करण्यात आलेल्या आहेत. भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत अंत्योदयाचा विचार करुन राबवलेल्या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत जाण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात भाजपकडून विविध बैठकांद्वारे ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना माजी आमदार बाळ माने यांनी कार्यकर्त्यांना केल्या आहेत. जिल्हा परिषद गटनिहाय मेळाव्यातून नागरिकांशी संपर्क अभियान सुरु केले आहे.

भाजपने रत्नागिरी तालुक्यातील उत्तर मंडलातील मिरजोळे जि. प. गट, खालगाव, करबुडे जि. प. गट आणि वरवडे जि. प. गट येथे झालेल्या बैठकांमध्ये कार्यकत्यांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण', 'मोफत गॅस', 'युवा प्रशिक्षण', कृषी 'पायाभूत सुविधा' आदी क्षेत्रांमध्ये सरकारच्या माध्यमातून कार्यान्वित होत असलेल्या योजनांची माहिती दिली. या योजनांचा लाभ ग्रामीण भागातील ग्रामस्थांपर्यंत पोहोचतो की नाही याची माहिती घेण्याच्या सूचनाही माजी आमदार व लोकसभेचे सहप्रभारी बाळ माने यांनी भाजप कार्यकत्यांना दिल्या आहेत.

मतदार व मतदार यादी आपल्या डोक्यात कायम घोळली पाहिजे. नवमतदारांची नोंदणी करणे, मृत लोकांची नावे कमी करणे ही कामे स्वतः लक्ष देऊन पूर्ण करणे गरजेचे आहे, अशा सूचनाही माने यांनी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत रत्नागिरी उत्तरचे तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे, जिल्हा उपाध्यक्ष बाळा नाचणकर, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता देसाई, भाजयुमो तालुकाध्यक्ष प्रतीक देसाई, अनंत खापले, घवाळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:00 PM 22/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow