संगमेश्वर : आरवली कुंभारखाणी मुख्य रस्ता बनलाय धोकादायक

Jul 22, 2024 - 13:38
Jul 22, 2024 - 14:42
 0
संगमेश्वर : आरवली कुंभारखाणी मुख्य रस्ता बनलाय धोकादायक

माखजन : संगमेश्वर तालुक्यातील आरवली-कुंभारखाणी हा मुख्य रस्ता प्रवाशांसाठी धोकादायक बनला आहे. या रस्त्याला नव्याने बांधण्यात आलेल्या मोरीचे काम अर्धवट झाले आहे. तसेच मोरीच्या व रस्त्याच्या बाजूचा मातीचा भराव निघून गेल्यामुळे हा मार्ग अधिकच धोकादायक बनला आहे. बाजूला गडनदीचे पात्र आहे. त्यामुळे या ठिकाणी संरक्षक भिंतीची गरज आहे. बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन या मार्गाची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:06 PM 22/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow