चिपळूण : रिगल कॉलेज-माळवाडी रस्त्यावर पथदीप

Sep 17, 2024 - 14:23
 0
चिपळूण : रिगल कॉलेज-माळवाडी रस्त्यावर पथदीप

चिपळूण : अपरात्री चालत किंवा दुचाकीने जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्या कोंढे माळवाडी, कळवंडे गावात जाणाऱ्या ग्रामस्थांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत आमदार शेखर निकम यांनी रिगल कॉलेज में माळवाडीदरम्यान रस्त्यावर पथदीपांची व्यवस्था करून दिली.

चिपळूण-गुहागर मार्गावरील कोंढे येथील रिगल कॉलेज ते कळवंडे रस्ता जातो. या रस्त्यावर माळवाडीपर्यंत लोकवस्ती नाही. त्यामुळे रात्रीचा या परिसरात अंधार असरामया वाड्‌या परिसर जंगलमय असल्याने जगली प्राणी, बिबट्या, साप यांसारखे प्राणी प्राणी ग्रामस्थांच्या नजरेत पडत होते शिवाय सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. या परिसरातील रस्त्यावर विजेची व्यवस्था व्हावी अशी मागणी होत होती; मात्र अडचणीमुळे ती पूर्ण झाली नव्हती कोंढे येथील माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष गणेश साबळे यांच्यासह प्रमुख ग्रामस्थांनी आमदार निकम यांच्याकडे हा प्रश्न मांडला. त्यांनी तातडीने जिल्हा नियोजनमधून ५ लाख ३२ हजार रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. त्यामुळे तिथे स्ट्रीटलाईट बसवण्यात आले. त्याचे उद्घाटन आमदार निकम यांच्या हस्ते नुकतेच झाले. या वेळी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, सरपंच माधवी कुळे, उपसरपंच हसन खान, माजी सरपंच रमेश करंजकर, शशिकांत साळवी, शिवसेना ज्येष्ठ नेते अशोकराव नलावडे, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष गणेश साबळे, विद्यमान तंटामुक्त समिती अध्यक्ष तुषार करंजकर, माजी पोलीस पाटील सुभाष नलावडे उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:51 PM 17/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow