आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन अटक करण्याची रत्नागिरी जिल्हा काँग्रेस पार्टीची मागणी

Sep 19, 2024 - 12:16
Sep 19, 2024 - 12:18
 0
आमदार संजय गायकवाड यांच्या  विरोधात गुन्हा दाखल करुन अटक करण्याची रत्नागिरी जिल्हा काँग्रेस पार्टीची मागणी

रत्नागिरी : खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात अतिशय निंदनीय वक्तव्य केल्याप्रकरणी बुलडाणा जिल्ह्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन अटक करावी, अशा मागणीचे निवेदन रत्नागिरी जिल्हा काँग्रेस पार्टीकडून पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना बुधवारी देण्यात आले.

काही दिवसांपूर्वी आ. संजय गायकवाड यांनी विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी यांच्या विरोधात त्यांची जीभ छाटणाऱ्यास ११ लाख रुपयांचे बक्षिस देउ असे अतिशय निंदनिय, माणुसकीला काळीमा फासणारे व बेकायदेशिरपणे जाहिर वक्तव्य प्रसार माध्यमांव्दारे केले होते. त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेतच पण कायद्याचेही उल्लंघन केले होते.

संजय गायकवाड यांच्यावर अनेक गुन्हे यापूर्वी दाखल असल्याचे समजते. परंतू राहुल गांधींच्या विरोधातील त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना कठोरात कठोर शासन होणे गरजेचे असल्यामुळे पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना त्वरित अटक करावी, अशा मागणीचे निवेदन रत्नागिरी जिल्हा काँग्रेस पार्टीतर्फे पोलिस अधिक्षकांना देण्यात आले.

यावेळी रत्नागिरी जिल्हा काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरुध्द कांबळे, जिल्हा अध्यक्ष अविनाश लाड, मा. जिल्हा अध्यक्ष महिला अॅड. अश्विनीताई आगाशे, प्रदेश सचिव (सेल) पर्शुराम खेत्री, जिल्हा सरचिटणीस रविंद्र खेडेकर, खाडीपट्टा अध्यक्ष दिलीप मोहिते आदि उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 PM 19/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow