चिपळूण : आगवे येथे महामार्गावर खड्डयांचं साम्राज्य

Jul 22, 2024 - 13:46
Jul 22, 2024 - 14:49
 0
चिपळूण : आगवे येथे महामार्गावर खड्डयांचं साम्राज्य

सावर्डे : चिपळूण तालुक्यातील आगवे येथे मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमय झाल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन तारेवरची कसरत करावी लागत आहे.

कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात चाकरमानी गणेश उत्सवासाठी कोकणात येतात, गणेशोत्सव ऐन तोंडावर आला असताना मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ हा पहिल्याच पावसात 'खड्यात' गेल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. गोव्याकडून येताना तीव्र उतार असल्याने सर्व प्रकारची वाहने ही वेगाने येत असतात. अचानक खड्डेमय रस्ता असल्याने त्या खड्यांमध्ये दुचाकीचे बऱ्याचदा पडून अपघात होतात.

तसेच मोठ्या वाहनांचे नुकसान होत आहे. स्थानिक ग्रामस्थांना महामार्गाची स्थिती माहीत असल्याने ते हालत डुलत बोटीने प्रवास केल्याचा आनंद घेत आहेत. परंतु, गणेशोत्सव तोंडावर आल्याने महामार्ग सुरळीत नाही झाला तर येथे मोठा अपघात घडण्याचे महामार्ग संबंधित अधिकारी वाट पाहत आहेत का, असा सवाल स्थानिक ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. संबंधितांनी यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:15 PM 22/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow