चिपळूण-संगमेश्वरला ६६ कोटी ६७ लाखांचा ग्रामसडक निधी

Jul 22, 2024 - 16:19
Jul 22, 2024 - 17:03
 0
चिपळूण-संगमेश्वरला ६६ कोटी ६७ लाखांचा ग्रामसडक निधी

चिपळूण : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील १३ रस्त्यांचा प्रश्न निकाली निघाला आहे. आ. शेखर निकम यांच्या प्रयत्नातून या रस्त्यांच्या दर्जा उन्नतीसाठी शासनस्तरावरून ६६ कोटी ६७ लाखांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.

आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्यामुळे साधारणतः एकूण ४० किलोमीटरपर्यंत एकूण १३ रस्त्यांची कामे पूर्णत्वास जाणार आहेत. या मंजूर झालेल्या कामांमध्ये कडवई विकास नगर ओकटेवाडी रस्ता ३.३ कि.मी., गोळवली रोड शेंबवणे वाडीदे तांबेडी येथे ४, कडवई घोसाळकरवाडी कुंभारखाणी बु. रस्ता ३, कर्ली गावठाणवाडी ते देवघर रस्ता ४.१५०, राष्ट्रीय महामार्ग ते वायंगणे कोंद्रण रस्ता ३.०५०, राष्ट्रीय महामार्ग ते गोळवली ब्राह्मणवाडी, खामकरवाडी, करंडेवाडी, देऊळवाडी, दुदमवाडी, राऊळवाडी रस्ता ३.१२०, धामापूर मावळंगे मांडरकरवाडी आंबेट माखजन रस्ता ३, धामापूर भायजेवाडी रस्ता ३ कि.मी., कालुस्ते कर्जिकर मोहल्ला रस्ता, आकले कादवड कोंडावळे धनगरवाडी शाखेसह रस्ता ३.१२५, किरडुवे ते बारेवाडी रस्ता २ तेर्ये रस्ता ते मुचरी वाशी किंजळे तिवरे रस्ता ३. ३०० व इजिमा ३८ ते नारडुवे सड्येवाडी मधलीवाडी रस्ता ३ किलोमीटर आदी रस्त्यांचा समावेश आहे.

या रस्त्यांची कामे मार्गी लागणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत असून त्यांनी आमदार शेखर निकम यांना धन्यवाद दिले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:45 PM 22/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow