क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बायोपीकमध्ये सई ताम्हणकरला करायचे आहे काम

Jul 22, 2024 - 15:06
Jul 22, 2024 - 16:07
 0
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बायोपीकमध्ये सई ताम्हणकरला करायचे आहे काम

ई ताम्हणकर (Sai Tamhankar) हे मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचं नाव आहे. अभिनय, मेहनत आणि टॅलेंटच्या जोरावर सईने केवळ मराठीच नाही तर बॉलिवूडमध्ये नाव कमावलं. अभिनयाबरोबरच सई ओळखली जाते.

ती तिच्या बेधडक स्वभावासाठी. अत्यंत परखडपणे ती तिची मतं मांडताना दिसते. सध्या पुन्हा सई चर्चेत आली आहे.

अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या सईला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा असल्याचे तिने सांगितले. सईने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती विविध प्रश्नांची उत्तर देताना दिसून येत आहे. यामध्ये सईला विचारण्यात आलं की तिला कुणाची ऐतिहासिक व्यक्तीरेखा साकारायला आवडेल, यावर सई म्हणाली, 'सावित्रीबाई फुले या सुपरहिरो आहेत. त्यांची भुमिका करायला आवडेल. त्यांनी जे काम केलं ते क्रांतीकारी होतं'.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:31 22-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow