रत्नागिरी : पर्यटन वाढीसाठी हाऊस बोटिंग, आलीशान बसेस

Jul 24, 2024 - 10:53
 0
रत्नागिरी : पर्यटन वाढीसाठी हाऊस बोटिंग, आलीशान बसेस

◼️ १५ ऑगस्टला शुभारंभ ; महिला सक्षमीकरणाची जोड

* चार आधुनिक बसेस
* १ कोटी ३२ लाखाचा प्रकल्प
* ५ अलिशान हाऊस बोट
* ५ कोटीचा प्रकल्प
* सिंधुरत्न योजनेतून निधी

रत्नागिरी : जिल्ह्यात पर्यटनाच्या आणखी काही वाटा खुल्या होणार आहेत. पर्यटन वाढीसाठी सिंधुरत्न विकास योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेतर्फे ४  आधुनिक बसेस आणि ५ अलिशान, आकर्षक हाऊस बोटी बांधण्यात आल्या आहेत. १ कोटी ३२ लाखाचा बसचा तर ५ कोटींचा बोटींचा हा प्रकल्प आहे. या पथदर्शी प्रकल्पाला महिला सक्षमीकरणाची जोड देण्यात आली आहे. बचत गटांच्या प्रभागसंघांकडून या बसेस आणि बोटी चालविल्या जाणार आहेत.

केरळ प्रमाणे  हाऊस बोटिंग आणि अलिशान बसेसचा पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. सिंधुरत्न योजनेतून या प्रकल्पाला निधी मंजूर झाला आहे. त्यातून अलिशान चार बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. एक बस साधारण २८ लाखाच्या दरम्यान आहे. सतरा आसनी या गाड्या आहेत. एसी, चार्जींग पॉइंडसर करमणुकीची साधने त्यामध्ये आहेत. रत्नागिरी, संगमेश्वर दर्शनासह अन्य ठिकाणी या बसेस जाणार आहे. त्यासाठी ऑनलाईन बुकिंग सुविधा ठेवण्यात येणार आहे. रत्नागिरी तालुक्याला २, संगमेश्वर १ आणि दापोली तालुक्याला १ बस दिली जाणार आहे.

५ कोटींचा हा प्रकल्प आहे. एक बोट १ कोटीची आहे, अशा ५ बोटी खरेदी करण्यात आल्या आहेत. अलिशान आणि आकर्षक अशा त्या बोटी आहेत. त्यामध्ये २ बेडरुम, एसी, नाष्ता, जेवण आदींची सुविधा आहे. जयगड ते दाभोळ असा खाडी जलमार्ग त्यासाठी निश्चित केला आहे. चिपळुण येथे मगर सफरचाही यात विचार आहे.  या दोन्ही प्रकल्पांसाठी जिल्हा परिषद मुख्याधिकारी कीर्तिकीरण पूजार यांनी पुढाकार घेतला. त्याला आता लवकरच मुहूर्त स्वरूप येणार आहे.


महिला होणार स्वावलंबी
दोन्ही प्रकल्प महिला बचत गटांच्या प्रभाग संघाला दिल्या जाणार आहे. एका प्रभाग संघामध्ये सुमारे ५० बचत गट असतात. या गटांना वेगवेगले पॅकेज दिले जाणार आहे. कोणाकडे जेवणाची व्यवस्था, बोट पार्किंग-देखभालचे पॅकेज अशी छोटी-छोटी पॅकेज तयार करून बचत गटाच्या महिलांना स्वावलंबी केले जाणार आहे.

निसर्गाने कोकणाला भरभरुन दिले आहे. पर्टनामध्ये ते वळविण्यासाठी आम्ही सिंधुरत्न योजनेतून हाऊस बोटिंग आणि आलिशान बसेसचा प्रकल्प हाती घेतला. बसेस आणि बोट बांधून झाल्या आहेत. १५ ऑगस्टला या प्रकल्पांचा दिमाखात शुभारंभ केला जाईल. -कीर्तिकीरण पुजार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 24-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow