रत्नागिरी : माळनाका येथे पाईप लाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया

Aug 7, 2024 - 11:33
Aug 7, 2024 - 11:36
 0
रत्नागिरी : माळनाका येथे पाईप लाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया

रत्नागिरी : भर पावसात शहरातील माळनाका येथे पुलाजवळ पाण्याची पाईप लाईन फुटून लाखो लिटर पाणी मागील दोन दिवस वाहून जात होते. नगर परिषद प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसत आहे.

पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्याने शीळ व पानवल ही शहराला पाणी पुरवठा करणारी दोन्ही धरणे ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून शहर परिसरात पाणीपुरवठा चांगल्या पद्धतीने सुरु आहे. त्यामुळे नागरिकही पाणी टंचाईच्या समस्येतून सुटले आहेत. त्यामुळे जलवाहिन्या फुटून पाणी फुकट जात असले तरी त्याकडे नगर परिषद प्रशासनही कानाडोळा करताना दिसत आहे.

शहरातील माळनाका येथे आयलॅण्डजवळच मागील दोन दिवसांपासून पाईप लाई फुटली असून त्यातून हजारो लीटर पाणी वाया जात आहे. सोमवार व मंगळवारीही दुपारी मोठ्याप्रमाणात पाणी बाहेर पडत होते. रस्त्याला झरे लागल्यागत पाणी बाहेर येत असल्याचे अनेक नागरिकांनी पाहिले.

या बाबत नगर परिषदेच्या प्रशासनाला माहिती देण्याचा प्रयत्नही काही नागरिकांनी केला. मात्र मंगळवारी नगर परिषद कर्मचाऱ्यांचे आंदोलन असल्याने नगर परिषदेकडून काही हालचाल झाल्याचे दिसून आले नाही. जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 PM 07/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow