पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी गाठली; कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग वाहतुकीसाठी बंद

Jul 25, 2024 - 11:25
 0
पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी गाठली; कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग वाहतुकीसाठी बंद

कोल्हापूर : राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापुरात (Kolhapur) देखील मुसळधार पाऊस सुरु आहे.

कोल्हापुरात पंचगंगा नदीनं (Panchganga river) धोक्याची पातळी गाठली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 43 फुटावर पोहोचली आहे. जिल्ह्यातील 81 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे.

राधानगरी धरण 100 टक्के भरलं, पाण्याचा विसर्ग सुरु

कोल्हापुरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं राधानगरी धरण 100 टक्के भरलं आहे. कोणत्याही क्षणी स्वयंचलित दरवाजा उघडण्याची शक्यता आहे. एका स्वयंचलित दरवाजा मधून सुमारे 1400 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पाण्याचा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पुण्यात पावसामुळं जनजीवन विस्कळीत

राज्याच्या अनेक भागात पावासाचा हाहाकार दिसून येत आहे. हवामान विभागाकडून पुढील 24 तासांंमध्ये महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा (Heavy Rain) देण्यात आला आहे, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. तर पुण्यात रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी घरांमध्ये वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मुसळधार पावसामुळं पुण्यातील शाळा आज (25 जुलै) रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. नागरिकांना सतर्कतेचं आवाहान करण्यात आलं आहे.तर सिंहगड परिसरामध्ये अनेक लोक अडकल्याची माहिती समोर आली आहे. खडकवासला धरणातून 40000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने आहे. मुठा नदीला पूर आला आहे. त्यामुळे पुणे शहरातील डेक्कन, सिंहगड रोड, एकता नगर, पूलाची वाडी या सखल भागांमध्ये पाणी शिरले आहे. पूलाची वाडी आणि एकता नगर परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाळी आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 25-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow