डॉ. तात्यासाहेब नातू यांचा आज ३२ वा स्मृतिदिन

Jul 25, 2024 - 10:01
Jul 25, 2024 - 11:35
 0
डॉ. तात्यासाहेब नातू यांचा आज ३२ वा स्मृतिदिन

गुहागर : कर्मवीर, देवमाणूस, माणुसकीचा झरा अशी बिरुदावली लाभलेले गुहागरचे प्रथम आमदार स्व. श्रीधर नातू अर्थात तात्यासाहेब नातू यांचा गुरुवार दि. २५ जुलै रोजी ३२ वा डॉ. तात्यासाहेब नातू स्मृतिदिन आहे.

केवळ राजकारण नव्हे तर १०० टक्के  समाजकारण करून जनतेच्या हृदयात स्थानबद्ध झालेल्या तात्यांचा हा स्मृतीदिन गुहागर तालुक्यातील सर्व शाळांमध्ये साजरा होणार आहे.

स्व. तात्यासाहेब नातू यांच्या खडतर जीवन प्रवासाची, समाजसेवी वृत्तीची, राजकीय व शैक्षणिक योगदानाची व कार्य कर्तृत्वाची माहिती सर्वसामान्यांना ज्ञात आहे. मार्गताम्हानेसारख्या एका गावात राहून सर्वसामान्यांची रुग्णसेवा करण्यातच तात्यांनी धन्यता मानली. राजकारणविरहित विकास हेच त्यांचे धोरण होते. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त स्व. डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठानच्या सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम, उपक्रम २२ जुलैपासूनच सुरु झाले आहेत. यापैकी प्रतिष्ठानच्या बोरगाव, अंजनवेल, मुंडर, देवखेरकी या माध्यमिक शाळांमध्ये तसेच मार्गताम्हाने येथील इंग्रजी माध्यम शाळेत चिपळूण डी.बी.जे. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्याम जोशी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 AM 25/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow