मंडणगड : कासवांच्या गावाची वाट दिवसागणिक खडतर...

Jul 26, 2024 - 14:22
Jul 26, 2024 - 14:26
 0
मंडणगड : कासवांच्या गावाची वाट दिवसागणिक खडतर...

मंडणगड : कासवांचे गाव म्हणून देश-विदेशात प्रसिद्ध असलेल्या वेळास गावाला जाणारी वाट दिवसागणीक खडतर होत चालली आहे. वेळास बाणकोट मार्गावर समुद्राच्या उधाणाच्या लाटांमुळे किना-यावर असलेला लाटांनी वाहून आलेला कचऱ्याचा खच रस्त्यावर पसरला आहे. लाटांमुळे रस्त्याची धूप होऊन रस्ता नादुरुस्त झाला असून, यामुळे वेळास गावाचा संपर्कच विस्कळीत झाला आहे.  जरी येथील नागरिकांची धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची मागणी अद्यापही अपूर्णच आहे.

याकडे प्रशासन कोणत्याही प्रकारे लक्ष देत नसल्याने स्थानिक ग्रामस्थ व वेळास गावाला भेट देशाच्या पर्यटकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. वेळास ठिकाणी कासवांचा जन्मोत्सव पाहण्याकरिता देश विदेशातून पर्यटक येत असतात, वेलास गावचे निसर्ग सौंदर्य पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असल्याकारणाने कासव महोत्सवा व्यतिरिक्त या ठिकाणी अन्य दिवशीही पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे. असे असताना वेळास गावाला जोडणारा बाणकोट ते वेळास या समुद्रालगत असलेल्या रस्त्याची समुद्राच्या उधाणामुळे दुरवस्था होत असल्याने येथील पर्यटन व्यवसायाला खीळ बसली आहे.

रस्त्याला असलेली दगडांची संरक्षक भिंत नष्ट झाल्याकारणाने समुद्राचे पाणी थेट रस्त्यावर येते. स्थानिक ग्रामस्थांना याची सवय झाली असली तरी पर्यटकांना मात्र जीव मुठीत घेऊन या मार्गावर प्रवास करावा लागतो.

समुद्राच्या उधाणाच्या उसळलेल्या लाटा देत सत्यावर येतात. या लाटांमुळे समुद्रावीण कचरा मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येऊन पडतो. यामुळे या मार्गावर वाहन चालवताना फार जिकिरीचे ठरते. अनेक वर्षापासून या मार्गानी उधाणामुळे दुरवस्थाच होत आहे. पण प्रशासन मात्र उदासीन आहे.

बाणकोट - वेळास या मार्गाला समुद्रालागत धुपतिबंधक बंधाऱ्याची मागणी जुनीच आहे. आता मात्र तेथील नागरिक संतप्त झालेत सरकारने येथे धुप्रतिबंधक बंधारा मंजूर करावा व याचबरोबर रस्त्याची उंची वाढवावी या मागणीला जोर वाढला आहे.

समुद्राला आलेल्या उधाणाच्या लाटांचा नेहमीच फटका बसतो त्यामुळे वेळास गावाचा तालुक्याशी संपर्क तुटतो. तेथील पर्यटन व्यवसायाला खीळ बसते. सरकारने समुद्रलगत असलेल्या या मार्गावर धुपप्रतिबंधक बंधारा मंजूर करून येथील समस्या दूर करावी- हेमंत सालदुरकर, वेळास 

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:48 PM 26/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow