गुहागर विधानसभा मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाचा दावा

Jul 27, 2024 - 11:55
Jul 27, 2024 - 15:08
 0
गुहागर विधानसभा मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाचा दावा

चिपळूण : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट तालुक्यात सक्रिय झाला आहे. शिंदे गटाच्या वतीने गुहागर विधानसभा मतदारसंघावर दावा करण्यात आला असून त्या दृष्टीने उमेदवाराची चाचपणी करण्यासाठी शिंद सेना सक्रिय झाली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे नेते व माजी आ. रवींद्र फाटक यांच्यावर गुहागर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली असून विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चाचपणी करण्यासाठी त्यांनी बुधवारी (दि. २४) दिवसभर चिपळूण, खेड आणि गुहागर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. चिपळूणात छोटेखानी मेळावा देखील झाला

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. महायुतीचे तिनही पक्ष आत्ता स्वतंत्रपणे आपापले सर्वेक्षण करीत आहेत. लोकसभेतील अनुभवावरून त्यांनी हा धडा घेतला आहे आणि प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे आपला उमेदवार आणि विधानसभा जिंकाण्याची क्षमता या मुद्दयावर सर्वेक्षण करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि भाजपा असे स्वतंत्र सर्व्हे घेण्यात येत आहेत. याच अनुषंगाने शुक्रवारी दिवसभर माजी आ. रवींद्र फाटक हे गुहागर विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. बुधवारी सकाळी ११ ना. त्यांनी शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण यांच्या स्वामी मंगल कार्यालयात चिपळूण आणि खेड येथील बैठक पदाधिकाऱ्यांची घेतली आणि उमेदवारांबाबत कानोसा घेण्यात आला. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर ते गुहागर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी गुहागरमध्ये दाखल झाले. 

या ठिकाणीही येथील पदाधिका-यांशी चर्चा करण्यात आली. गुहागर विधानसभा मतदारसंघाकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष लक्ष दिले आहे आणि या मतदारसंघाची आपल्यावर जबाबदारी सोपविल्याचे रवींद्र फाटक यांनी या बैठकीत जाहीर केले. आता गुहागर मतदारसंघात सर्वेक्षण सुरू असून सात-आठ दिवसांत हा अवहाल पक्षाचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात येईल आणि गुहागरच्या जागेबाबत तेच योग्य तो निर्णय घेतील, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. चिपळुणातील बैठकीला खेड व चिपळूणमभील पदाधिकारी, उपनेते सदानंद चव्हाण, तालुकाप्रमुख संदेश आगरे, महिला आघाडी तालुका संघटक सुप्रिया सुर्वे, शहर संघटक प्राजक्ता टकले, तालुका समन्वयक दिलीप चव्हाण, शहरप्रमुख उमेश सकपाळ, शहरप्रमुख उमेश सकपाळ, शशिकांत चाळके, सदानंद पवार, सर्व उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, महिला आघाडी, युवा सेना पदाधिकारी आदी उपस्थित होते. रश्मी गोखले, माजी जि. प. सदस्य अरविद चव्हाण, माजी उपसभापती लक्ष्मण शिगवण, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

सदानंद चव्हाण यांना न्याय मिळणार!
गुहागर विधानसभा मतदारसंघातून उपनेते सदानंद चव्हाण यांना उमेदवारी देणार का, असा प्रश्न रवींद्र फाटक यांना विचारला असता ते म्हणाले, या बाबतचा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच घेऊ शकतात. आमचे नेते सदानंद चव्हाण यांनी कुठे उमेदवारी लढवावी हे सर्वस्वी नेते ठरवतील. आता महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून हा निर्णय होईल आणि श्री. चव्हाण यांना योग्य न्याय मिळेल, असेही संकेत यावेळी रवींद्र फाटक यांनी दिले, चिपळुणातील बैठकीला खेड व चिपळूणमधील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:18 PM 27/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow