लांजा तालुक्यात पावसामुळे मोठे नुकसान

Jul 29, 2024 - 10:59
 0
लांजा तालुक्यात पावसामुळे मोठे नुकसान

लांजा : वादळी वाऱ्यासह तालुक्यात बुधवारी २४ जुलै रोजी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची एकच दाणादाण उडाली असून कुर्णे, खेरवसे व पुनस या गावांमध्ये घरांवर झाडे पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. दि. २४ जुलै रोजी वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे घरे, गोठे यांचे नुकसान झाले असून महावितरणचेही वीज खांब मोडून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे तर तालुक्यातील बहुतांशी भाग हा खंडित वीज पुरवठ्यामुळे हैराण झालेला दिसून येत आहे. 

कुर्णे येथील रामकृष्ण एकनाथ कुलकर्णी यांच्या अंगणातील मंडपावर दि.२४ जुलै रोजी फणसाचे झाड पडून १० पत्रे फुटून नुकसान झाले तर पुनस वरचीवाडी येथील बबन केशव गुरव यांच्या घरावर झाड पडून १० पत्रे फुटून नुकसान झाले. याचबरोबर खेरवसे जाधववाडी येथील रवींद्र गंगाराम सावंत यांच्या घरावर वडाचे झाड पडून घराला तडे गेले आहेत. त्याचप्रमाणे लांजा शहरासह तालुक्यात ठीक ठिकाणी वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रचंड गैरसोयींना सामोर जावे लागत आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 29/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow