वाहतुकीस अडथळाप्रकरणी डंपरचालकावर गुन्हा दाखल

Sep 21, 2024 - 11:54
 0
वाहतुकीस अडथळाप्रकरणी डंपरचालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : तालुक्यातील लांजा ते साटवली जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशा रितीने डंपर उभा करणाऱ्या चालकावर लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवार, १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

नदीम इक्बाल म्हालदार (३६) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड कॉस्टेबल रहिम मुजावर यांनी तक्रार दिली आहे. 
त्यानुसार, गुरुवारी सायंकाळी संशयित चालक नदीम म्हालदारने आपल्या ताब्यातील डंपर (एमएच ०४-जीसी- ९५६०) हा महिलाश्रम लांजा येथे सार्वजनिक रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना व वाहनांना धोका होईल तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशा रितीने उभा केला होता. याप्रकरणी चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम २८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 21-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow